Download App

News Arena India Survey : रोहित पवारांना धोबीपछाड देणे राम शिंदेंना अवघडच

  • Written By: Last Updated:

News Arena India Survey : न्यूज एरिया इंडिया संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात जिल्हा निहाय सर्व्हेही करण्यात आला आहे. त्यात अनेक आमदारांना घरी बसण्याची वेळ येऊ शकते, असे सर्व्हे सांगतो. त्यात नगर जिल्ह्यामध्ये भाजप (BJP) व राष्ट्रवादीला (NCP) यांना समान पाच-पाच जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. दोन ठिकाणी उलटफेर होऊन भाजप जागा जिंकेल असा अंदाज आहे. (news-arena-india-survey-rohit-pawar-ram-shinde)

नगर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक सहा आमदार आहेत. तर भाजपचे तीन आमदार आहेत. एक अपक्ष आमदार आहे. तर दोन काँग्रेसचे आमदार आहेत. या सर्व्हेत भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या पाच जागा निवडूण येतील. काँग्रेसचे दोन जागा निवडूण येतील, असा सर्व्हेचा अंदाज आहे. भाजपच्या दोन जागा वाढतील, तर राष्ट्रवादीच्या दोन जागा घटतील, असा अंदाज आहे. भाजप दोन जागा अधिक जिंकू शकतो. त्या जागा राहुरी व कोपरगावच्या आहेत.

News Area India Survey : पंकजांसाठी ‘परळी’ अवघडचं; नवा मतदारसंघ शोधावा लागणार?

पण कर्जत-जामखेड मतदारसंघात कोणताही बदल होणार नाही. हे सर्व्हेच्या अंदाजानुसार स्पष्ट होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार हे आमदार आहेत. पवारांनी राम शिंदेंना पराभूत केले होते. ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने राम शिंदेंना ताकद दिली आहे. राम शिंदेंनी विधानपरिषदेवर घेतले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी यश मिळविले आहे. कर्जत-जामखेड बाजार समित्या राम शिंदेंच्या ताब्यात आहेत. शिंदेंनी जिल्ह्याचे नामांतरही करून घेतले आहे.


विखेंना धक्का! गणेश कारखाना थोरात-कोल्हेंनी हिसकावला…

पण या ठिकाणी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस जागा राखेल म्हणजे पुन्हा रोहित पवार हेच निवडून येतील, असा अंदाज सर्व्हेचा आहे. त्यामुळे राम शिंदे यांच्यासाठी हा मतदारसंघ अवघडच असल्याचे स्पष्ट होत आहे.

Tags

follow us