Download App

Video : चावी फडणवीसांकडे, मी फक्त सांगतो; शिंदेंनी सांगितलं सरकारचं अर्थगणित

  • Written By: Last Updated:

अहमदनगर: अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणीचा आज (31 मे) यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखंडे, खा डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर,माजी मंत्री मधुकर पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदेंनी गतीमान सरकारच्या कामांचा पाढा वाचला तसेच हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र काम करावे असे आवाहन केले. मात्र, या कौतुकाच्या भाषणात शिंदेंनी चावी फडणवीसांकडे असल्याची कबुली दिली. त्यामुळे शिंदे केवळ नावापुरते मुख्यमंत्री असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.

शिंदे म्हणाले की, निळवंडेच्या उर्वरित कामाला कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन देत चावी फडणवीसांकडे आहे. मी केवळ सांगायचे काम करतो. ते लगेच तिजोरी उघडतात आणि पैसे देतात. त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही याची सर्वांनी खात्री बाळगा. आपल्या भागात प्रकल्प कसे चांगले येतील, विकास कसा होईल यासाठी सर्वांनी हेवेदावे विसरून याचा विचार करावा.  हे सरकार आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत  असा शब्ददेखील शिंंदेंनी यावेळी उपस्थिताना दिला.

शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, निळवंडे प्रकल्पासाठी 53 वर्ष वाट पाहावी लागली. शेतकऱ्यांना जादा मदत मिळावी, यासाठी NDRF चे निकष बदलले. झालं गेलं गंगेला वाहिलं, आता स्वच्छ पाणी येणार. शेतकऱ्याच्या आयुष्यात चांगले दिवस येणार. महायुतीच सरकार सगळ्यांच सरकार मी शेतकऱ्याचा मुलगा हे काही लोकांना सहन होत नाही.

चौंडीतील वादावरून अजित पवारांचे कानावर हात; म्हणाले रोहितनं…

१९७० मध्ये हा प्रकल्प महालादेवी या नावाने मंजूर झाला. १९९५ मध्ये हे धरण निळवंडे येथे स्थलांतरित करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. मंजुरीच्या वेळी त्याची अंदाजे किंमत ७.९ कोटी रुपये होती. आता ते २०२३ मध्ये पूर्ण झाले असून, त्यावर ५ हजार १७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच भूमिपूजनानंतर तब्बल ३१ वर्षांनी निळवंडे धरणाच्या कालव्यात प्रथमच चाचणीसाठी पाणी सोडण्यात आले. प्रस्थापितांचे राजकारण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, बांधकामासाठी वेळोवेळी केली गेलेली अपुरी आर्थिक तरतूद, प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांसाठी अनेकवेळा बंद पाडलेले काम, राजकारणी, ठेकेदार, अधिकारी यांचे हितसंबंध त्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Video : विखे पाटील-पिचड-लोखंडे एकत्र आले अन् निळवंडेचे पाणी वाहिले… : फडणवीसांनी सांगितली Inside Story

निळवंडे धरण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाचा इतिहास ५० वर्षांपेक्षा जूना आहे. १९७० मध्ये प्रवरा नदीवर म्हाळादेवी येथे धरण बांधण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली. १९७७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या हस्ते धरणाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र धरणात बुडणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे धरणाची जागा दोन वेळ बदलावी लागली. अखेर निळवंडे येथे जागा निश्चित झाली. मे १९९२ मध्ये धरणाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

Tags

follow us