Download App

तोकड्या कपड्यांना मंदिरात ‘No Entry’…तरुणी म्हणतायत…

‘No Entry’ to Temples With Torn Jeans and Short Dress : राज्यात नागपूर, अमरावतीनंतर आता अहमदनगर शहरातील प्रसिद्ध असलेले ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासह 16 मंदिरात तोकडी कपडे घालून येणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघ व संबंधित मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला आहे. दरम्यान या निर्णयावर तरुणीने आपले मत व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच संस्कृतीच्या जपवणुकीसाठी हाच निर्णय योग्य असल्याचे देखील यावेळी काही तरुणी म्हणाल्या आहेत.

नगर शहरातील काहि ठरविक मंदिरांनी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तासाठी मंदिर प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अंगप्रदर्शन करणारी, तोकडे किंवा उत्तेजक कपडे परिधान केलेल्या भक्तांना आता दर्शन घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाच मंदिर महासंघाने घेतली आहे. प्रशासनाच्या या निर्णयानंतर आता महिला व तरुणींनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आपली संस्कृतीचे जपवणूक केले पाहिजे. इतर देशांमधील संस्कृतीचे आपण आचरण का करावे? ते आपली संस्कृती पाळत नाही तर आपण का त्यांच्या संस्कृतीला महत्व देतो अशी प्रतिक्रिया एका तरुणीने दिली आहे. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना असे कपडे घालू देऊ नये. महिला व मुलींनी असे तोकडे कपडे घालूच नये. तसेच हा निर्णय योग्यच आहे. छोटे कपडे घालणे हे अयोग्य असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असेही तरुणी तसेच महिला या म्हंटल्या आहेत.

शहरातील या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू : श्री विशाल गणपती मंदिर (माळीवाडा), भवानी माता मंदिर (बुणऱ्हानगर), शनि मारुती मंदिर (दिल्लीगेट), शनि मारुती मंदिर (माळीवाडा), शनि मारुती मंदिर (झेंडीगेट), गणेश राधाकृष्ण मंदिर (मार्केट यार्ड), विठ्ठल मंदिर (पाईपलाईन रस्ता), दत्त मंदिर (पाईपलाईन रस्ता), श्रीराम मंदिर (पवननगर, सावेडी), भवानी माता मंदिर (सबजेल, चौक) रेणुकामाता मंदिर (केडगाव), श्रीराम मंदिर (वडगाव गुप्ता), पावन हनुमान मंदिर (वडगाव गुप्ता), संत बाबाजी मंदिर (वडगाव गुप्ता), साईबाबा मंदिर (केडगाव), खाकीदास बाबा मंदिर (लालटाकी) या १६ मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू केली आहे.

Tags

follow us