Download App

कर्जत MIDC चा वाद चिघळला! शिंदेंनी रोहित पवारांकडे मागितला कर्जत-जामखेडचा हिशोब

Ahmednagar Politics : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकारण आता ढवळून निघत आहे. या मतदारसंघातील प्रलंबित असलेला एमआयडीसीचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी थेट विधानसभेत नेत पवार-शिंदे राजकीय वादाला वेगळीच धार दिली. मतदारसंघात एमआयडीसी होत नाही त्यामागे राम शिंदेच आहेत असा आरोप आरोप आ. पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपावर विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लेट्सअप मराठी प्रतिनिधीने विधीमंडळाच्या आवारात आ. शिंद यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे यांनी रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर भूमिका स्पष्ट केली.

केंद्रात मंत्री मराठी अन् महाराष्ट्रातीलच रस्त्यांची दुरावस्था : मुलावरील टीकेनंतर ठाकरेंचं गडकरींवर तोंडसुख

कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी होत नाही यामागे राम शिंदे आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यावर शिंदे म्हणाले, यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. 25 वर्षांपूर्वीच येथे एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे. 25 वर्षांच्या इतिहासात मी देखील प्रयत्न केले परंतु, तेथे उद्योग काही आले नाहीत. तुमचं देखील सरकार (महाविकास आघाडी) होतं. कर्जत आणि जामखेड हे मतदारसंघातील दोन तालुके आहेत. तिथे का उद्योग नाही आणले? तिथे का नाही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला? असे सवाल त्यांनी केले.

कर्जतची एमआयडीसी झालीच पाहिजे. मी सुद्धा 2009 पासून यासाठी प्रयत्न करत आहे. एमआयडीसीसाठी अनेक वेळा लक्षवेधी आणली. तारांकित प्रश्न उपस्थित केले. या माध्यमातून हा प्रश्न मी विधीमंडळात विचारला. आज देखील नियम 97 अन्वये हा विषय मी चर्चेसाठी आणला आहे. या संदर्भात मी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारणार आहे, असे शिंदे म्हणाले.

खत लिंकिंगचा बाजार रडारवर! शेतकऱ्यांच्या फसवणुकीला बसणार चाप; मुंडेंनी सांगितला सरकारी प्लॅन

 

Tags

follow us