Download App

अबब! अहमदनगर जिल्हा बँकेत 12 कोटींच्या जुन्या नोटा पडून

Two Thousand Notes Ahmednagar District Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. चलनातील सर्वात मोठी असलेली दोन हजार रुपयांची नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या नोटा येत्या 30 सप्टेंबर पर्यंत बँकांमध्ये जमा करून त्याबदल्यात दुसऱ्या नोटा घेता येणार आहे. मात्र, आधीच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्यातील आणि देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोटा अद्याप देखील बदलून मिळालेल्या नाहीत. यातच अहमदनगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्यालयात तब्बल 12 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याबाबतची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली आहे.

दोन हजारांच्या नोटबंदीचा निर्णय आरबीआयने काही दिवसांपूर्वी घेतला आहे. यातच 23 मे पासून या 2000 हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिक बँकेत जाऊ शकतात असे आदेश आरबीआयने दिले आहे. यामुळे नागरिक देखील बँकेकडे धाव घेऊ लागले आहे. मात्र हे सगळे सुरु असताना काही वर्षांपूर्वी झालेली नोटबंदीमध्ये पाचशे व एक हजारांच्या नोटा या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ती नोटबंदी राज्यातील काही जिल्हा बँकांसाठी डोकेदुखी ठरली.

त्या नोटबंदीच्या काळात बँकांनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा या स्वीकारल्या मात्र जिल्हा बँकांमधील नोटा त्यांना अद्यापही बदलून मिळाल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्यालयात 12 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पडून असलेल्या जुन्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आले आहे. दरम्यान अद्यापही नोटा बदलून मिळाल्या नाहीत, अशी माहिती जिल्हा बँकेचे सीईओ वर्पे यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यातील नऊ आणि अन्य काही राज्यांतील अशा जिल्हा बँकांमध्ये जुन्या 500 आणि 1000च्या 112 कोटी रुपये मूल्याच्या नोटा अद्यापही पडून आहेत. रिझर्व्ह बँकेने या नोटा बदलून दिलेल्या नाहीत. त्यामुळे आता दोन हजारांच्या नोटा कशा जमा करणार? असा पेच जिल्हा बँकांपुढे आहे.

दोन हजारांच्या नोटा स्वीकारतो
2000 रुपयांच्या नोटांबाबत अहमदनगर जिल्हा बँकेचे सीईओ रावसाहेब वर्पे म्हणाले की आम्ही या नोटा स्वीकारतो आहे. बँकेत एका वेळेला 20 हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जात आहे. तसेच खात्यात जमा करण्यास कोणतीही अडचण नाही. दरम्यान दोन हजारांची नोट ही आधीच बाजारात उपलब्ध नाही आहे. यामुळे यंदाच्या नोटबंदीमुळे फारसा असा काही फरक पडेल असे वाटतं नसल्याची प्रतिक्रिया वरून यांनी दिली आहे.

Tags

follow us