Sports : अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर : शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation)व मॅक्सिमस स्पोर्टस अकॅडमीच्या (Maximus Sports Academy) संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं (Two Day District Level Badminton Tournament)आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत जिल्ह्यातील 150 खेळाडू सहभागी झाले आहेत. अकॅडमी व स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशच्या अध्यक्ष आशाताई फिरोदिया(Ashatai Firodia) यांच्या हस्ते […]

Untitled Design (16)

Untitled Design (16)

अहमदनगर : शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation)व मॅक्सिमस स्पोर्टस अकॅडमीच्या (Maximus Sports Academy) संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं (Two Day District Level Badminton Tournament)आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत जिल्ह्यातील 150 खेळाडू सहभागी झाले आहेत. अकॅडमी व स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशच्या अध्यक्ष आशाताई फिरोदिया(Ashatai Firodia) यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
YouTube video player
शहरातील बालिकाश्रम रस्ता परिसरातील वाकळे पाटील स्पोर्टस कॉम्प्लेक्स (Wakle Patil Sports Complex)येथे आजपासून मॅक्सिमस स्पोर्टस् अकॅडमीची अहमदनगरमधील दुसरी शाखा सुरू झाली आहे. यावेळी मॅक्सिमस स्पोर्टस अकॅडमीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia), उद्योजक विक्रम फिरोदिया(Vikram Firodia), आशाताई फिरोदिया, राखी फिरोदिया(Rakhi Firodia), सतीश वाकळे(Satish Wakle), संदीप जोशी (Sandeep Joshi) आदी उपस्थित होते. या मैदानात चार होवा कोर्ट तयार करण्यात आले आहेत. तसेच मॅक्सिमस स्पोर्टस अकॅडमीनं दोन राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळं अहमदनगर शहरात जागतिक दर्जाचं बॅडमिंटन प्रशिक्षण मिळणारंय. 

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, फिरोदिया परिवार हा अहमदनगरच्या सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक आदी क्षेत्रात उत्तम काम करत आहे. सामाजिक जाणिवेतून ते काम करत आहेत. क्रीडा क्षेत्रातही फिरोदिया परिवाराचे मोठे योगदान आहे. 

महापालिकेच्या माध्यमातून सारसनगर येथे नवीन क्रीडा संकूल उभारण्याचं काम सुरू झालंय. त्यासाठी शासनानं निधी उपलब्ध करून दिलाय. आता अभ्यासाएवढंच खेळाला महत्त्व आलंय. त्यासाठी 10 ते 15 खेळांचं मैदान आम्ही उभारत आहोत. निश्चितच खेळाडू याचा फायदा घेतील. खेळामध्ये सुद्धा आपण करिअर करू शकतात, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी अहमदनगरमध्ये शांतिकुमारजी मेमोरियल फाउंडेशनने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील एकही खेळाडू चमकला नाही. त्यामुळं अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन खेळाडू तयार करण्यासाठी आम्ही वाडिया पार्क येथील मैदानावर मॅक्सिमस स्पोर्टस अकॅडमी सुरू केली.

या अकॅडमीमुळं जिल्ह्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक आले. त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू पुढे आले. वाडिया पार्कमध्ये अकॅडमीला वाढता प्रतिसाद पाहता सावेडीतही मॅक्सिमस अकॅडमीची दुसरी शाखा सुरू करण्याची गरज निर्माण झाली. सावेडीत वाकळे पाटील परिवाराची अकॅडमी होती. ती अकॅडमी आम्ही मॅक्सिमस तर्फे चालवण्यास घेतली आहे. याचा खेळाडूंनी फायदा घ्यावा, असे आवाहन नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

Exit mobile version