Download App

नगर मनपाच्या प्रशासकपदी आयुक्तच, पहिल्या दिवशी झाडाझडती !

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : नगर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) प्रशासकपदाची सूत्रे शासन निर्देशानुसार डॉ. पंकज जावळे (Dr. Pankaj Jawle) यांच्याकडे देण्यात आले आहेत. या प्रशासकपदाची सूत्रे हाती घेताच आयुक्त डॉ. पंकज जावळेंनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या सर्व विभागांना भेटी देऊन दिल्या. यावेळी त्यांनी विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना आपापली प्रशासकीय कर्तव्य तत्परतेने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिल आहेत.

कामचुकार कर्मचाऱ्यांना नोटीस…
लोकनियुक्त 68 नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्याकाळ बुधवारी पूर्ण झाला. त्यामुळं आता महापालिकेच्या कारभाराची सूत्रे प्रशासकाच्या हाती आलेत. प्रशासकपदाचा पदभार स्वीकारताच डॉ. जावळे यांनी सर्व विभाग प्रमुखांना आपापला विभाग व मनपा मुख्य इमारत स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती मागवून विभागात असलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची देखील माहिती संकलित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. कामचुकार व निर्देशांचे पालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही डॉ. जावळे यांनी दिले आहेत.

प्रशासकपदी जिल्हाधिकाऱ्यांचे नावही होते चर्चेत
नगर मनपाच्या नगरसेवकांचा कार्यकाळ 27 डिसेंबर रोजी संपल्यानंतर महानगरपालिकेच्या प्रशासकपदी कोण येणार याबाबत शहरात चर्चा रंगली होती. प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी सिताराम सालीमठ यांचे नाव चर्चेत होते, त्याचबरोबर मनपाचे आयुक्त पंकज जावळे यांचे नाव देखील रेसमध्ये होते. प्रशासकपदी कोण नियुक्त होणार ही चर्चा सुरु असताना 28 तारखेला रात्री उशिरा नगर विकास खात्याकडून अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकपदी जावळे यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर सर्व चर्चा थांबल्या होत्या.

महानगरपालिकेत आता प्रशासक राज्य सुरू झाले असल्याने प्रशासक म्हणून महापालिका प्रशासनाचे सर्व अधिकार आयुक्त डॉ. जावळे यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त डॉ.जावळे यांची जबाबदारी वाढली आहे. प्रशासक पदाच्या कालावधीमध्ये शहराचे अनेक प्रश्न ते कसे हाताळतात याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे

follow us