जळगाव : अडीच तीन वर्ष लोक अडचणीत होते, लोक मरत होते, तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही, आता त्यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे. आता त्यांना लोकांचे प्रश्न दिसत आहेत, महागाई दिसत आहे, असे म्हणत खेड येथे होणाऱ्या उध्दव ठाकरेंच्या सभेवरुन मंत्री गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे.
आता लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हकलले आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यांनी आता कितीही सभा घेतल्या, तरी त्यांचा उपयोग नाही. लोकांनी एकदा यांना संधी दिली होती, या संधीची यांनी माती केली आहे. अशा परखड शब्दात महाजनांनी ठाकरेंवरती टीका केली.
पुढे कापसाच्या भावावर बोलताना महाजन म्हणाले… कापसाला एकीकडे 12 हजार भाव होता, मात्र सध्या जे भाव कापसाला आहेत, ते खते असतील, रासायनिक औषधी असतील, या तुलनेत खऱ्या अर्थाने कमी आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Sandeep Deshpande : सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा नेता जाणून घ्या संदीप देशपांडेंचा राजकीय प्रवास
आंतराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या गठाणींना भाव कमी झाल्यामुळे हा भाव थोडा तुटलेला आहे, पण निश्चित सरकार याबाबत सकात्मक विचार करतेय, व याच अधिवेशनामध्ये निश्चित सकारात्मक निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबत होईल, असा विश्वासही यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सर्व किंमतीची भाव वाढ अवलंबून असते त्यामुळेच गॅस सिलेंडर असेल तर इतर वस्तूंचे दर वाढल्याचे स्पष्टीकरणही यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.