Ram Shinde on Radhakrishna Vikhe : गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या निवडणुकीवरुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय वाद टोकाला गेला आहे. आमदार राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली आहे. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे, असा राम शिंदेंचा आरोप आहे. राम शिंदेंच्या आरोपात कोणतेही तत्थ नाही. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखेंनी यांनी केला होता. पण राम शिंदेंनी आज पुन्हा एकादा विखेंवर जोरदार टीका केली आहे.
पक्षात मला कोणी एकटं पाडायाचा प्रयत्न केला तरी मी भाजपच्या मुशीत वाढलेला कार्यकर्ता आहे. स्व. गोपीनाथजी मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कितीही एकटं पाडलं तरी संघर्षातून पुढं जाईल. माझी विचारधारा मला योग्य ठिकाणी घेऊन जाईल, असा टोला राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांना लागवला आहे.
‘आप्तेष्ठांनी बेईमानी केली पण देवाने साथ दिली’; विखे-शिंदे वाद टोकाला
आमच्यात मार्केट कमिटीचा वाद आहे. फॉर्म भरल्यापासून विखे विरोधाची भूमिका घेत होते. शेवटपर्यंत वाटत होतं की मिळतजुळतं होईल पण झालं नाही. त्यांचा पीए आमच्या विरोधात उभा राहिला. त्यांच्याकडून उपसभापती झाला. मी खासदार आणि पालकमंत्री यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. पण त्यांनी योग्य दखल घेतली नाही, असे राम शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील दंगलीवरुन बच्चू कडूंचा संताप, ‘…तर त्यांचे हात छाटले पाहिजे’
जे अगोदर आरोप केले होते ते अजूनही आरोप कायम आहेत. विखेंचा अनुभव मला विधानसभेला देखील आला आहे. आताही दररोज येतो आहे. आता मार्केट कमिटीच्या निवडणुकीत प्रत्यक्षात पाहिला. भारतीय जनता पार्टीत राधाकृष्ण विखेंना एकरुप आणि अनुरुप व्हायाला वेळ लागलं असं वाटतंय. भाजपात कधीही तत्वांशी तडजोड केली जात नाही. भाजपाच्या विचारधारेशी अनुरुप व्हायला बाहेरुन आलेल्या लोकांना वेळ लागतो, अशी टीका राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर केली.