Ram Shinde on Radhakrishna Vikhe : गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे आणि आपण त्यांची तक्रार केली असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले होते. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना राम शिंदेंचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मतभेद असतील तर पक्षाच्या मिटींगमध्ये चर्चा करु असे विखेंनी म्हटले होते. परंतु आमच्यातील वाद अजूनही मिटलेला नाही, असे राम शिंदे यांनी सांगितले.
राम शिंदे म्हणाले की गेली तीस वर्ष झाले मी एकाच पक्षाचा म्हणजे भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या नियमाचं अटीच पालन करुन मी मार्केट समिती फॉर्म भरण्यापासून निकलापर्यंत दम काढला. कुठे ही काही वाच्यता केली नाही. त्यामुळे सर्व स्तरावर यांची नोंद ठेवण्यात आली आहे. प्रयत्न पराकाष्ठा करुनही आप्तेष्ठ धोका देतात. त्यावेळी प्रसार माध्यमांसमोर जाण्यावाचून पर्याय राहत नाही, राम शिंदे यांनी सांगितले.
नड्डांचे भाषण सुरु अन् मंत्र्यांना झोप आवरेना
सभापतीच्या निवडणुकीनंतर ज्यावेळी आमचे स्वकीय आमच्या विरोधात ठाकले होते, त्यावेळी सर्व बाबी मी वरिष्ठांच्या कानावर घातल्या होत्या. जरी आप्तेष्ठ बेईमान झाले तरी देवाने आम्हाला प्रतिसाद दिला. ईश्वरचिठीमध्ये भाजपाचा सभापती झाला. त्यामुळे नियमाचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही आणि करणार देखील नाही, असे राम शिंदे यांनी सांगितले.
बाळासाहेब म्हणाले होते…काँग्रेस सोबत जायची वेळ आली तर मी शिवसेना बंद करेल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे यांना एकत्र बसून वाद मिटवल्याचे सांगितले होते. यावर राम शिंदे म्हणाले की आम्ही अजून एकत्र बसलो नाहीत. बोलवणार असतील असं वाटतं. बाजार समितीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि कार्यकर्त्यांना विरोध करणे हे काही धोरण होऊ शकत नाही. पालकमंत्री हे जिल्ह्याचे सर्वश्रेष्ठ असतात. काही तक्रारी केल्यानंतर लगेच दखल घेणं गरजेच असतं पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. योग्य दखल घेतली नाही म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली, असे राम शिंदे यांनी सांगितले.