Download App

Ahmednagar News : अहिल्यादेवींच्या नावाचा राजकीय वापर, आमदार जगतापांनी सत्ताधाऱ्यांना झापले

  • Written By: Last Updated:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे नाव आहिल्यानगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknatha Shinde) यांनी केली होती. आता यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagatap) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काहींना अहिल्यादेवी आत्ताशी आठवू लागल्या आहेत. अहिल्यादेवींचे नाव राजकारणासाठी वापरले जात आहे. आंम्ही मागील दहा वर्षापासून नगर शहरातील सावेडी उपनगरात अहिल्यादेवींची जयंती उत्सव साजरा करत आलो आहोत. भिस्तबाग चौकाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी चौक नाव देण्यासाठी पुढाकार घेऊन महापालिकेत ठराव घेतला व शहरात पहिल्यांदाच एका चौकाला अहिल्यादेवींचे नाव देण्याचे काम करण्यात आल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.(Political use of Ahilya Devi’s name, MLA Jagtap criticizes on Government)

यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी आमदार संग्राम जगताप हे बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, स्वतःला व्यासपीठ, ओळख नसलेले काही व्यक्ती अहिल्यादेवींच्या नावाचा राजकीय अजेंडा घेऊन, झेंडे हातात घेत आहे. मात्र त्यांनी या महान व्यक्तींचे विचार व कार्य महित असणे आवश्यक आहे. अन्यथा राजकीय अजेंडा बदलला की, त्यांचा झेंडा देखील बदलतो.

लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल

महापुरुषांच्या विचाराला धरून नाही, तर अजेंड्यावर चालणारे हे कार्यकर्ते असल्याचे म्हणतच आमदार जगताप यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच पुढे बोलताना जगताप म्हणाले, लवकरच पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी चौकात स्वागत कमान, अहिल्यादेवींचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर संस्थेचे सर्व समाजाला बरोबर घेऊन सुरु असलेले कार्य व विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्‍यांना पुरस्कार रुपाने दिलेले पाठबळाचे त्यांनी कौतुक केले.

याप्रसंगी प्रा. डॉ. लक्ष्मणराव मतकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश थोरात, जय असोसिएशनचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, लक्ष्मण मतकर, रावसाहेब काळे, योगेश खेंडके, राजेंद्र तागड, इंजि. डी.आर. शेंडगे, शर्मिला नलावडे, ज्योती उनवणे, मच्छिंद्र बिडकर, डॉ. संतोष गिर्‍हे, विजय भालसिंग, आबा रणवरे, अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर, अरुण वाघमोडे, अफसर शेख, अजय जाडकर, डॉ. धीरज ससाणे, बाबासाहेब राशीनकर, विठ्ठल दातीर, प्रमिला शेळके आदी उपस्थित होते.

Tags

follow us