Download App

सामाजिक कार्यकर्त्यांचं चक्क अजय देवगणसाठी भीक मांगो आंदोलन; काय आहे कारण?

  • Written By: Last Updated:

नाशिक : देशभरातील लहान मुलांसह तरुणाईमध्ये ऑनलाईन गेम्सचा (online games) विळखा घट्ट होत चालला. यामुळं अनेकदा अनुचित प्रकार घडल्याचंही समोर आलं. या ऑनलाईन गेम्सच्या जाहिराती मराठीसह अनेक हिंदी कलाकार करत आहेत. यामुळं तरुणाई गेम्सकडे आकर्षित होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूीवर नाशिकच्या प्रकाश कनोजे (Prakash Kanoje) यांनी चक्क अभिनेता अजय देवगणसाठी (Ajay Devgn) भीक मांगो आंदोलन सुरू केले आहे. (Prakash Kanoje Bhik Mango Aandolan for ajay devgn and demand stop ad of online games)

आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. विशेषतः लहान मुले आणि तरुण वर्ग ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेला. यातून मुलांच्या आत्महत्या सारख्या देखील घटना घडत आहेत. त्यातच अनेक कलाकार हे या ऑनलाइन गेम्सचा प्रचार करत असल्याचं दिसतं. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणही एका ऑनलाइन अॅपसाठी जाहिरात करत आहे. मात्र, ऑनलाईन गेम्समुळं अनेकजण बर्बाद झालेत. त्यामुळे देवगन यांनीह ही जाहिरात करू नये,अशी मागणी नाशिकच्या प्रकाश कनोज यांनी केली. याशिवाय, त्यांनी भीक मांगो आंदोलनबी सुरू केले. या आंदोलनातून जे काही पैसे जमा होतील ते अजय देवगणला पाठण्यात येणार असल्यांचं त्यांनी सांगितलं. हे अनोखे आंदोलन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. कनोजे यांनी भीक मांगो आदोलन सुरू केल्यानंतर या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच होतोय.

कनोजे हे लॉन्ड्री व्यावसायिक असून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा हातभार असतो. सध्याच्या भीक मांगो आंदोलनातून ते नाशिक शहरातील विविध भागात जाऊन जनजागृती करत आहेत. माईकच्या माध्यमातून ते अभिनेता अजय देवगकडे खूप काही असूनही जाहिरातींच्या माध्यमातून ऑनलाइन गेमिंगला प्रोत्साहन देत आहेत, अशी जाहिरातींचा तरुणावर वाईट प्रभाव पडतो. म्हणूनच मी हे आंदोलन करत असल्याचं कनोजे यांनी सांगितलं

प्रकाश कनोजे सांगतात, केवळ अजय देवगणच नाही तर अनेक क्रिकेटपटू खेळाच्या जाहिरातीही करत आहेत. यापुढील आंदोलनात इतर अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंच्या विरोधात आंदोलन करणार आहे. तरुण पिढी बरबाद होत असून हे आंदोलन कुठेतरी थांबले पाहिजे, असे कनोजे म्हणाले. दरम्यान, आंदोलनातून त्यांनी सुमारे 204 रुपये जमा केले होते, ते त्यांनी मनीऑर्डरद्वारे अजय देवगनला पाठवले आहेत.

Tags

follow us