Download App

डॉक्टरांची गैरहजेरी गर्भवतीच्या जीवावर बेतली; वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Ahmednagar Hospital : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे कारवाडी येथून प्रसुतीस आलेल्या रेणुका किरण गांगुर्डे या आदिवासी महिलेवर वेळेत उपचार झाले नाही. तिचा अति रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्र घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी आता चासनळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहिल खोत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि कंत्राटी रुग्णवाहिका चालक यांच्यावर सुद्धा सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.( Pregnant women dead due to Doctors Absence Medical officer suspend in Ahmednagar )

RBI चा मोठा निर्णय! पिनशिवाय करता येणार 500 रुपयांचे व्यवहार; लवकरच येणार AI आधारित पेमेंट

नेमके प्रकरण काय ? जाणून घ्या
याबाबत अधिक माहिती अशी कारवाडी येथील रहिवासी अशोक राणु वाघ यांची मुलगी रेणुका किरण गांगुर्डे ही प्रसुतीसाठी माहेरी आलेली होती. गुरुवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता रेणुका यांना प्रसुतीकळा चालू झाल्याने तिला चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी नेण्यात आले. मात्र या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण उपस्थित परिचारिका यांनी दिले व संबंधित महिलेला धामोरी येथील उपकेंद्रात नेण्याचे सांगण्यात आले.

आजच्या चित्रपटात दोनच व्हिलन, एक राजकारणी अन् दुसरा.. फडणवीसांनी सांगितलं राजकारणाचं ब्रँडिंग

दरम्यान वाघ यांनी अ‍ॅम्बुलन्सची मागणी केली असता वाहनास डिझेल उपलब्ध नसल्याचे सांगितले. अशोक वाघ यांनी आपल्या मुलीला खासगी वाहनातून धामोरी उपकेंद्रात दाखल केले मात्र तोपर्यंत बराच कालावधी देखील झाला होता. प्रसूतीसाठी महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले व त्यानंतर बाळाच्या प्रसुतीनंतर अतिरक्तस्रावामुळे काही वेळात रेणुका यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान याप्रकरणी काही सामाजिक संघटनांनी आवाज उठविला. तसेच या घटनेच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सेवा निलंबनाची कारवाई केली. यासह एक डॉक्टर व रूग्णवाहीकेचा चालक अशा दोघांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज