Download App

जाणत्या राजाने जनाधार गमावला, आता राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावं; विखेंचा पवारांना टोला

, शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावे,

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव करत महायुतीने (Mahayuti) पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या या लाटेत मविआचा धुव्वा उडाला. यावरून आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला. जाणते राजे असणाऱ्या पवारांनी आपला जनाधार गमावला. त्यामुळे आता त्यांनी राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावे, अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली.

“मी तसं म्हणालोच नव्हतो”, मविआबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवेंनी स्पष्टच सांगितलं 

मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारपासून मतदारसंघात सक्रीय झालेत. त्यांनी अहिल्यानगरमधील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावे, पवारांनी लोकांचे वाटोळे केलं. त्यांनी आता जनता आणि राज्याचं आणखी वाटोळं करू नये, असंही विखे-पाटील यांनी म्हटलं.

Prajakta Mali : प्राजक्ताच्या नव्या फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष 

विखेंनी यावेळी आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देणाऱ्यांवर शरसंधान साधले. ते
म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मविआला घवघवीत यश मिळाले, महायुतीची पिछेहाट झाली होती, त्यावेळी ईव्हीएमबाबत शंका का व्यक्त केली नाही? ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा देऊन टाकायला हवा होता. निवडणूक नाकारायला हवी होती. जनमत बाजूने असेल तर ईव्हीएम चांगले आणि विरोधात गेलं तर ईव्हीएम वाईट, असं विरोधकांचे धोरण असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मविआत एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ते पळवाटा शोधत आहेत. त्यांनी आपण आधार गमावला हे मान्य करायला हवे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याबाबत अनेक बेताल वक्तव्ये केली आहेत, त्याची शिक्षा त्यांना जनतेनं दिल्याचं विखे म्हणाले.

माझ्यावर ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा सदैव आशीर्वाद राहिला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा देखील आशीर्वाद आहे. मला दिलेल्या संधीचं मी चांगलं काम करून दाखवलं आहे, पक्ष नेतृत्वाचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे, त्यावरुन मला ते निश्चितपणे चांगली जबाबदारी देतील, असा विश्वासही विखेंनी व्यक्त केला.

राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हा दावा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी फेटाळून लावला. माध्यमांनी हे रान उठवलंय की, एकनाथ शिंदे नाराज आहेत. ते नाराज असल्याचं काही कारण वाटत नाही, असं असंही विखे पाटील यांनी म्हटलं.

follow us