Ahmednagar शहराला गारांच्या पावसाने झोडपले, नागरिकांची तारांबळ

अहमदनगर : सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला आहे. आज अहमदनगर शहराला देखील गारांच्या पावसाने झोडपले. अचानक आलेला पाऊस आणि त्यात गारा पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं अहमदनगर शहरात पाहायला […]

Gara

Gara

अहमदनगर : सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला आहे. आज अहमदनगर शहराला देखील गारांच्या पावसाने झोडपले. अचानक आलेला पाऊस आणि त्यात गारा पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं अहमदनगर शहरात पाहायला मिळालं.

गेल्या दोन- तीन दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी वातावरणात मोठा बदल झाला आहे. ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. उन्हाळा तोंडावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडल्याचं पहायला मिळतंय. त्यात आता गारपीटही होत असल्याने शेतऱ्यांच्या संकटात भर पडत आहे.

Maharashtra Rain : पावसाने पिके झाली आडवी, हताश शेतकऱ्याने घेतले तोंड झोडून..

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला त्यावेळी देखील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्येही जोरदार झाला.आज पुन्हा अहमदनगर शहरात दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. शहरात दुपारी पावणे दोनच्या सुमारास पाऊस झाला. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत ग्राहकांसह व्यापाऱ्यांची धावपळ झाली.

Exit mobile version