Ram Shinde : फडणवीसांची पाठ फिरताच विखे-शिंदेंमध्ये पुन्हा ठिणगी; मी जो दावा केला तो…

Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन भाजपमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अल्पावधीच या ठिणगीने आगीचे रुप धारण केले. राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली. दरम्यान अहमदनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने या दोघांमधील वादावर […]

Untitled Design   2023 05 27T191702.591

Untitled Design 2023 05 27T191702.591

Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन भाजपमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अल्पावधीच या ठिणगीने आगीचे रुप धारण केले. राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली. दरम्यान अहमदनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने या दोघांमधील वादावर पडदा पडला. मात्र पुन्हा एकदा राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नाव न घेता विखेंवर निशाणा साधला आहे.

राम शिंदे हे अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शिंदे यांनी पुन्हा एकदा विखे यांच्याशी झालेल्या वादावर भाष्य केले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले. मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. शेवटी वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठ झालेल्या गोष्टीबाबत मी पक्षांच्या वरिष्ठ यांना कळवले व पक्षांनी ऐकून घेतले. मात्र यावर अद्याप काही एक उत्तर आले नाही आहे. म्हणूनच मी जो काही दावा केला तो खरा आहे. त्यामुळे वरिष्ठांनी सांगितल्यानंतर आता कोठेतरी थांबणे गरजेचे आहे. मी अनेकदा थांबायला तयार देखील आहे. मात्र ज्यांच्याकडून चूक झाली आहे त्यांनी देखील चूक सुधारणे गरजेचे आहे, असे म्हणतच शिंदे यांनी विखेंवर अप्रत्यक्ष भाष्य केले आहे.

PHOTO : मोर विषयावर लोकसभा आणि कमळ विषयावर राज्यसभा; पहा- नवीन संसदेचा प्रत्येक कोपरा स्मार्ट वैशिष्ट्यांनी सुसज्ज

शिंदे – विखे वादात फडणवीसांची मध्यस्थी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी फडणवीसांना विखे-शिंदे वादावर प्रश्न केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, दोघांमधील वाद म्हणून तर दोघांना सोबत घेऊन बसलो आहे. समन्वय आहे, काही काळजी करू नका. काही वाद नाहीत. वाद असले तरी वादळ नाही, चिंता करु नका. चहाच्या पेल्यातील वादळ आता संपले असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Exit mobile version