Download App

मोदी-आंबेडकरांची भेट होणार?; ठाकरेंचा डाव उधळण्यासाठी आठवले लावणार ताकद

  • Written By: Last Updated:

Ramdas Aathvale on Prakash Aambedkar : सत्तासंघर्षानंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये वेळोवेळी वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे चित्र सर्वांनीच पहिले आहे. एकनाथ शिंदेंना वेगळं करत भाजपने या आधीच उद्धव ठाकरेंची ताकद कमी केली आहे. त्यानंतर आता आठवले गटाच्या माध्यमातून भाजप ठाकरेंची उर्वरित ताकदही संपवण्याचा डाव आखत आहे. शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे. त्यांच्या या ऑफरवर आता प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, आठवलेंच्या माध्यमातून भाजप ठाकरे गटाला खिळखिळ करण्याची खेळी तर करत नाहीये ना? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

Ramdas Aathvale : प्रत्येकाने मला तोंड दाखवण्याची गरज नाही; पक्षशिस्तीवरून आठवलेंनी झाप झाप झापले

रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिक पक्ष ज्यांच्यासोबत असतो ते सत्तेत येतात. प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत. ते आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ते म्हणतात की त्यांची वंचित बहुजन आघाडी ज्यांच्यासोबत आहे. ते सत्तेत येतात. पण वंचित आघाडी कधीही सत्तेत आलेली नाही. ते कधी कोणासोबत गेलेले नाही. ते स्वतःच्या जीवावर निवडणुका लढतात आणि पराभूत होतात. मात्र मी निवडणूक लढतो मी एकदा पडलेलो देखील आहे. पण आता मी पडणार नाही.

Video : ‘सिर्फ एक बंदा काफी है’ मनोज वाजपेयीची लढाई

मी पडण्यासाठी राजकारण करत नाही. माझ्या पक्षाच्या पाठींब्याने अगोदर कॉंग्रेस आणि आता भाजप-शिवसेना यांची देखील सत्ता आलेली आहे. उद्धव ठाकरे आमच्यासोबत नाहीत. मी प्रकाश आंबेडकरांना सांगू इच्छितो की, तुम्ही इकडे-तिकडे फिरू नका. तुम्ही माझ्यासोबत या मी तुम्हाला भाजपमध्ये घेऊन जातो. आपण दोघं मिळून भाजपसोबत राहू. नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहू. उद्धव ठाकरेसोबत तम्हाला काही मिळणार नाही. तर उद्धव ठाकरेंना देखील माझा सल्ला आहे की, तुम्ही सुद्धा कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नादी लागू नका. असा सल्ला देखील यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनाही दिला.

Tags

follow us