Download App

Rohini Khadase : मणिपूर घटनेवर संसदेत भाजपच्या महिला नेत्या गप्प का? रोहिणी खडसे संतापल्या

  • Written By: Last Updated:

Rohini Khadase : मणिपूरच्या घटनेवरील संसदेतील चर्चेवरून रोहिणी खडसे (Rohini Khadase) यांनी भाजपवर टीका केली. त्या म्हणाल्या की, मणिपुरमध्ये ज्याठिकाणी नग्न अवस्थेत महिलेची धिंड काढली गेली. संसदेत त्यावर बोलण्याऐवजी भाजप सरकारकडून राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किसची चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्या सरकरमधील कोणत्याही महिलेने त्यावर आवाज उठवला नाही. असं म्हणत त्यांनी जोरदार प्रहार केली. त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जळगाव दौऱ्याच्या सभेमध्ये बोलत होत्या.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली, आरोपांच्या फैरी झाडत काँग्रेसने घेरले

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

पुढे रोहिणी (Rohini Khadase) म्हणाल्या जळगाव जिल्ह्यामध्ये होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना प्रत्येकाला आचंबित करतात. अशीच घटना मणिपुरमध्ये घडली. ज्याठिकाणी नग्न अवस्थेत महिलेची धिंड काढली गेली. संसदेत त्यावर बोलण्याऐवजी भाजप सरकारकडून राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किसची चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्या सरकरमधील कोणत्याही महिलेने त्यावर आवाज उठवला नाही. तसेच आमच्या जळगाव जिल्ह्यात देखील महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Bharat : ‘इंडिया’च नाही तर ‘या’ नावांनीही भारताची ओळख; जाणून घ्या, इतिहास

त्यामुळे महिला सुरक्षित नसतील आम्ही बघायचं कुणाकडे? लहान मुलींवरही अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी पक्ष म्हणून महिला सुरक्षिततेसाठी आवाज अठवावा अशी विनंती यावेळी रोहिणी खडसे यांनी केली. तसेच त्यांनी यावेळी खानदेशातील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता वाचून दाखवली. तसेच यावेळी रेहिणी खडसे (Rohini Khadase) यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर देखील लक्ष वेधले आहे.

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जळगाव दौरा आहे. यावेळी ते सभा घेत आहेत. तर या अगोर शरद पवारांच्या महाराष्ट्रदौऱ्यामध्ये त्यांनी मराठवाडा आणि कोल्हपूरच्या सभा घेतल्या आहेत. त्यावेळी त्यांच्यासह स्थानिक नेत्यांनी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांवर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Tags

follow us