Download App

‘शिंदे साहेब, सत्तेची नशा…’ आमदाराच्या धमकीनंतर पत्रकाराला मारहाण, रोहित पवारांचं टीकास्त्र

Rohit Pawar on Shivsena MLA : शिवसेनेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांच्या धमकीनंतर पत्रकाराला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंच्याच पक्षाच्या आमदाराच्या धमकीने हा प्रकार घडल्याने त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी या प्रकरणाचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे. (Rohit Pawar Criticize Shivsena MLA Kishor Patil CM Shinde for hitting Jurnalist in Jalgaon )

Video : देवही असुरक्षित! चोरटयांनी लुटली दानपेटी…चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांनी संदीप महाजन या पत्रकाराला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात त्यांनी या पत्रकाराला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता या पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली आहे.

काँग्रेसमुळेच पवार साहेबांची पंतप्रधानपदाची संधी हुकली; अजितदादांचीही मोदींना साथ

दरम्यान या पत्रकाराने जळगाव जळगाव जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकऱणावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांनी या पत्रकाराला फोनवर शिवीगाळ केला होता. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. जे केल ते सांगायला घाबरणार नाही. असं म्हणत किशोर पाटलांनी ही क्लिप आपलीच असल्याचंही म्हटलं होतं.

काय म्हणाले रोहित पवार?

या संपूर्ण प्रकणावरून आता मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी या प्रकरणाचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे. रोहित पवार म्हणाले, ‘पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची. का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून…’

पुढे ते म्हणाले, ‘विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली. त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे.ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना , स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का ? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो, सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे,परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे.’

तसेच या प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सरकारवर टीका करत आहेत. तसेच मुख्यमंत्री शिंदेंच्याच पक्षाच्या आमदाराच्या धमकीने हा प्रकार घडल्याने इतरांकडून काय कायदा आणि सुव्यस्थेची आपेक्षा करणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Tags

follow us