Download App

Budget Session : पोलिसांसाठी विधिमंडळामध्ये आमदार जगताप आक्रमक

अहमदनगर : ‘अहमदनगरच्या पोलिसांच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे. पोलीस कर्मचारी हा रात्रंदिवस ड्युटी करतो. त्यामुळे या लोकांच्या राहण्याची व्यवस्था देखील चांगली असावी कारण अहमदनगरच्या पोलिसांना अजूनही ब्रिटीश कालीन मोडकळीस आलेल्या क्वार्टर आहेत. 2019 ला त्याठिकाणी वीजेच्या शॉर्टसर्कीटने दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखील घटना घटली होती. त्यानंतर पोलिसांच्या नव्या घराचा प्रस्ताव देखील शासनाकडे मांडण्यात आला आहे. तर या अर्थसंकल्पातून पोलिसांना नवी घरं मिळतील अशी अपेक्षा होती. पण या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतुद न केल्याने पोलिसांमध्ये शासनाचं आपल्याकडे लक्ष नसल्याची भावना निर्माण झाली आहे.’ त्यामुळे पोलिसांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली ते अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करत असताना बोलत होते.

सध्या विधिमंडळामध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सागर केल्यानंतर अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा सुरू आहे. यावेळी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगरच्या पोलिसांच्या घराच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली. ते म्हणाले की, ‘अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करत असतात. संपुर्ण महाराष्ट्र या अर्थसंकल्पाची वाट पाहत होता. अनेक साधक-बाधक चर्चा अर्थसंकल्पावर होत असतात. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहता अहमदनगरसारख्या मोठे जिल्ह्यांचं अर्थसंकल्पाकडे बारकाईने लक्ष असत. कोण-कोणत्या जिल्ह्यांना काय-काय मिळालं ही देखील चर्चा होत असते. मात्र अहमदनगर जिल्ह्याला या अर्थसंकल्पातून नवीन असं काहीच दिसत नाही.’

‘त्यामुळे सरकराने याचा विचार करणं गरजेचं होत. त्याचबरोबर भौगोलिक दृष्ट्या मोठा जिल्हा असूनही अहमदनगरमध्ये पोलिसांचं संख्याबळ अत्यंत कमी आहे. त्यामुळे शहरातील विविध शासकिय कार्यालये तेथिल सुरक्षा, स्थानिक स्वराज्य संस्थांतील सुरक्षा, नागरिकांची सुरक्षा तसेच इतर आपत्तींमध्ये रजेवरही काही कर्मचारीअसतात. त्यामुळे पोलिसांची संख्या कमी पडते. परिणामी तपासास दिरंगाई, प्रशासनार ताण येणे, अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे पोलिसांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांची संख्या वाढवणं देखील गरजेचं आहे.’

Maharashtra Police : फडणवीसांचे गृहखाते अजितदादांच्या रडारवर; म्हणाले, आता पोलिसांनाच..</a>

‘गुन्हेगारी आणि अनेक प्रकरणं हे पोलीस आणि गृहखात्याच्या मोठ्या समस्या बनल्या आहेत. ही परिस्थिती सर्वत्रच आहे. त्यामुळे पत्रकांरांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याचं उदाहरण म्हणजे कोकणातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची झालेली हत्या. तसेच नांदेड जिल्ह्यातील संजय कंदरकर यांची घटना असो. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालणे, कायदा आणि सुव्यवस्थेवर देखरेख ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी महत्त्वाचे आहे. ते पोलिसांची संख्या वाढवणे.’ अशी मागणी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केली ते अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करत असताना बोलत होते.

Tags

follow us