Download App

पवारांचं मोदींना चॅलेंज; असेल नसेल तेवढी सत्ता वापरा भ्रष्टाचार केल्याचं निष्पन्न झालं तर पाहिजे ती शिक्षा द्या

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Narendra Modi : दहा-बारा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून जाहीरपणे सांगतो, आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारात सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा. तपास करा. सखोल चौकशी करा आणि ज्याने भ्रष्टाचार केलाय असं निष्पन्न झालं तर त्याला पाहिजे ती शिक्षा द्या. त्यासाठी आम्हा सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा राहील”, असं चॅलेंज शरद पवारांनी दिलं.

काही लोकांनी सांगितले की पवारसाहेबांनी नाव दिलं आणि आम्ही निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही पण एका नावात घोटाळा झाला. त्यांचा अनुभव वेगळा आला. आज मी इथं आलोय तर कोणाचे कौतुक करण्यासाठी नाही. कोणावर टीका करण्यासाठी नाही. आज मी याठिकाणी माफी मागणीसाठी आलोय, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की मी माफी यासाठी मागतोय की माझा अंदाज सहसा चुकत नाही. पण इथं माझा अंदाज चुकला. माझ्या विचारावर तुम्ही निकाल दिले. त्यामुळे तुम्हाला देखील यातना झाल्या. माझ्या निर्णयामुळे तुम्हाला यातना झाल्या असतील तर माझं कर्तव्य आहे की तुम्हा सर्वांची माफी मागायची. पण माझी मागत असताना दुसरी गोष्ट कधीकाळी लोकांसमोर जाण्याची वेळी येईल त्यावेळी पुन्हा इथं येईल. पुन्हा इथं येऊन चुक करणार नाही. योग्य निकाल सांगेल, असे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीत मीठाचा खडा टाकणारा शकुनी टरबुज्याच्या आकाराचा की कमळाच्या आकाराचा; कोल्हेंचा हल्लाबोल

राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी पक्षबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यातील पहिली जाहीर सभा छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील येवला मतदारसंघात झाली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.

मी पक्षात कोणते पद मागितले?; येवल्याच्या सभेतून सुप्रिया सुळेंनी घेतला समाचार

ते पुढं म्हणाले की पुरोगामी विचारांना नाशिकरांनी नेहमी साथ दिली आहे. शेतकरी, कष्टकरी लोकांवर अनेक संकट आली पण त्यांनी कधी साथ सोडली नाही. काही लोकांना जनतेसमोर सादर केल्यानंतर मुंबईत यश मिळवता आलं नाही. त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत आणायचे असेल तर त्यासाठी भक्कम मतदारसंघाची आवश्यकता आहे म्हणून आम्ही येवल्याची निवड केली, असे शरद पवार यांनी सांगितले.

Tags

follow us