आमचे सहकारी आता परत फिरणाऱ्या चिमण्या नाहीत; तणावातही पवारांची शाब्दिक कोटी

Sharad Pawar on Chhagan Bhujbal : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर काही वर्षांनी बाळासाहेब ठाकरे यांनी या चिमण्याने परत फिरा अशी साद घातली होती. आता राष्ट्रावादीत बंडखोरी झाल्यानंतर आणखी वाद वाढू नये म्हणून सोडून गेलेल्या लोकांना परत फिरण्याचे आवाहन केले जाणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाशिक येथील पत्रकार परिषदेत केला. यावर शरद […]

NCP News : शरद पवारांचा शिर्डीत मुक्काम! राष्ट्रवादीच्या शिबिरातून साधणार लोकसभेचं गणित?

NCP News : शरद पवारांचा शिर्डीत मुक्काम! राष्ट्रवादीच्या शिबिरातून साधणार लोकसभेचं गणित?

Sharad Pawar on Chhagan Bhujbal : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर काही वर्षांनी बाळासाहेब ठाकरे यांनी या चिमण्याने परत फिरा अशी साद घातली होती. आता राष्ट्रावादीत बंडखोरी झाल्यानंतर आणखी वाद वाढू नये म्हणून सोडून गेलेल्या लोकांना परत फिरण्याचे आवाहन केले जाणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाशिक येथील पत्रकार परिषदेत केला. यावर शरद पवार म्हणाले की आमचे सहकारी आता परत फिरणाऱ्या चिमण्या नाहीत.

शरद पवार म्हणाले की संघर्ष वाढावा असे माझ्याकडून काही होणार नाही. संघर्ष वाढू नये ही इच्छा आहे. कोणाला फेर विचार कारायचा असेल तर त्याला देखील काही हरकत नाही. पण त्या चिमण्या राहिलेल्या नाहीत. ह्या चिमण्यांची मानसिक स्थिती नाही, असा टोला शरद पवार यांनी लागवला. राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी पक्षबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला असून ते महाराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यातील आजच्या पहिल्या दिवशी ते छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील येवला या मतदारसंघात गेले होते.

छगन भुजबळांना ओळखण्यात माझी चूक झाली… नाशिकमध्ये शरद पवारांची जाहीर कबुली

नाशिक जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी अजित पवारांची साथ दिली आहे. त्यामुळे अजित पवारांसह बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात छगन भुजबळ यांच्या येवल्यापासून केली आहे. आज सकाळी शरद पवार नाशिकमध्ये झाले. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. आज सायंकाळी त्यांची येवल्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर शरद पवार नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

Exit mobile version