Download App

उद्या शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’; राधाकृष्ण विखे पाटलांचे शक्ती प्रदर्शन

Shasan Aaplya Dari : महाराष्ट्र शासनाचा बहुचर्चित ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम उद्या (17 ऑगस्ट) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) येथे पार पडणार आहे. महसूलमंत्र्यांच्या (Radhakrishna Vikhe Patil) जिल्ह्यात होत असलेल्या या कार्यक्रमाला अनेक विघ्नांना सामोरे लावे लागले आहे. अनेकदा या कार्यक्रमाची तारीख जाहीर झाली मात्र काहींना काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता. यापूर्वी तीनदा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली आहे. मात्र अखेर उद्या शिर्डीमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्याची मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शिर्डी येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तारीख मिळाली असून आता ‘सीएमओ’ कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा जारी करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी वर्ग धावपळ करताना दिसून येत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शिर्डी मध्ये उद्या पार पडणार आहे. महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे यांच्याकडे या कार्यक्रमाचे नियोजन आहे.

नगरच्या कलाकाराची कलाकृती झळकणार थेट अयोध्येत, रामायणातील थ्रीडी मॉडेल साकारणार

गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काकडी येथे या उपक्रमाचे नियोजन करत आहे. खुद्द मंत्री विखे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरसावले असल्याने प्रशासनाची धावपळ देखील वाढली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला आहे.

हा भव्यदिव्य कार्यक्रम यापूर्वी मुख्य अतिथींच्या तारखा उपलब्ध होत नसल्याने पुढे ढकलावा लागत होता अशी चर्चा होती. पण अखेर मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा ‘सीएमओ’कार्यालयाकडून आल्यामुळे नगर जिल्ह्यात शिर्डी जवळ काकडी विमानतळ परिसरात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम पार पडणार आहे.

Ahmednagar News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच भुईकोट किल्ल्यात देशविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी !

शासन आपल्या दारी’ राज्याच्या या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे स्वतः राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित आहे. विविध शासकीय योजनांच्या प्रमाणपत्रांचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते केले जाते. तसेच याच कार्यक्रमात शासनाच्या योजनांची माहिती देखील दिली जात आहे.

लाभार्थ्यांसाठी 600 बसेसची सोय
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 30 हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.

शरद पवारांनी फिरवला नवाब मलिकांना फोन; दोघांत नेमकी काय झाली चर्चा?

प्रत्येक तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमास येता यावे यासाठी 600 पेक्षा अधिक एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी गावनिहाय रूटप्लॅन, लाभार्थी वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचतील यादृष्टीने नियोजन करावे.

Tags

follow us