Sanjay Raut : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात (Lok Sabha Election 2024) वाहत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या चर्चा वेगात सुरू आहेत. त्यातच आता नवीन मित्र जोडण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) समाविष्ट करून घेणार का? असा प्रश्न आज पत्रकारांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारला. त्यावर राऊत यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत हा विषयच निकाली काढला. संजय राऊत आज नाशिक (Nashik News) दौऱ्यावर होते. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना मनसेबाबत प्रश्न विचारला. राऊत म्हणाले, देशाची लोकशाही वाचविण्याची सध्या गरज आहे. वंचित बहुजन आघाडीनेही स्वतःहून म्हटले होते की आम्हाला महाविकास आघाडीत घ्या. त्यामुळे ज्या कुणाला लोकशाही वाचवायची असेल त्यांनी स्वतःहून पुढे यावे.
Sanjay Raut : फडणवीस गृहमंत्री आहेत की, गुंडांचे सागर बंगल्यावरील बॉस आहेत? राऊतांचा सवाल
शेतकऱ्यांना अगदीच कमी नुकसान भरपाई दिली जाते. आधी सिलेंडरचे दर वाढूवन नंतर दोन रुपयांनी कमी केले जातात या पलीकडे काय मिळणार, अर्थसंकल्पातूनही सर्वसामान्यांना काय मिळणार असे सवाल राऊत यांनी केले. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना तुरुंगात टाकू अशी घोषणा करत पंतप्रधान मोदी करत यांनी शिखर बँक आणि सिंचन घोटाळा चव्हाट्यावर आणला. त्याचे आता काय झाले यावर मोदी आणि भाजपाने उत्तर द्यावे, असे राऊत म्हणाले.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना काल जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली. या प्रकरणावरही राऊत यांनी भाष्य केले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी संधान बांधण्यास नकार दिला. निडरपणे ते कारवाईला सामोरे जात आहेत. लोकनियुक्त मुख्यमंत्री असलेल्या मुख्यमंत्री सोरेन यांच्याविरुद्ध ईडीच्या माध्यमातून कारवाई करणे कितपत योग्य आहे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut : ‘भाजप डरपोक, ‘ईव्हीएम’ है तो मोदी है’ ‘चंदीगड पॅटर्न’चा उल्लेख करत राऊतांचा घणाघात