International Film Festival (IFFI) : गोव्यातील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील लघुपट, चित्रपट दाखविण्यात (IFFI) आले आहेत. यात अहिल्यानगरच्या मातीत तयार झालेल्या हमसफर लघुपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. हा लघुपट हा मूकपट आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, अहिल्यानगरमधील कलाकारांचा अभिनयाला जोरदार दादही मिळाली.
हमसफर लघुपटाची इंडियन पानोरोमा सेक्शनमध्ये निवड झाली होती. या सोहळ्यात लघुपटाचे निर्माते नरेंद्र फिरोदिया, दिग्दर्शक अभिजीत दळवी, को- प्रोड्यूसर राखी फिरोदिया यांना इफ्फीकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. याबाबत उद्योजक व लघुपटाचे निर्माते नरेंद्र फिरोदिया म्हणाले, आमच्यासाठी हा वेगळा अनुभव होता. इफ्फीमध्ये येऊन गर्व वाटतो. हमसफर अहिल्यानगरचा लघुपट आहे. इंडियन पेनोरोमामध्ये आम्हाला इंट्री मिळाली. संपूर्ण इफीचा अनुभव चांगला आहे. फार वेगळं वाटलं. मी इफीचे आभार मानतो. (Short film ‘Humsafar’ from Ahilyanagar soil wins honour at IFFI, produced by Narendra Firodia)
हा चित्रपट हसवतो आणि डोळ्यात पाणीही आणतो-नरेंद्र फिरोदिया
माझी कर्मभूमी व जन्मभूमी अहिल्यानगरची आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर हे सोडली तर उर्वरित कलाकार हे अहिल्यानगरचे होते. या संपूर्ण लघुपटात डायलॉग नाहीत. आहे. ही सायलेंट फिल्म आहे. आपल्या मातीतील कलाकार स्टेज मिळविण्यासाठी धडपड असतात. अहिल्यानगर करंडकची निर्मिती त्यासाठीच झाली आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स, अहिल्यानगर फिल्म कंपनीचा एकच उद्देश आहे, आपल्या मातीतील कलाकारांना संधी मिळाली पाहिजे. तुम्हाला चित्रपट हसवतो आणि तुमच्या डोळ्यातही पाणी आणतो. विजय पाटकरसारखे चांगला अभिनेते आम्हाला मिळाले आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार दोनदा मिळाला आहे. इफ्फीमध्ये आम्ही दोनदा आलो आहे. आमच्या कलाकृती बर्लिन आणि ऑस्करपर्यंत जाईल, याची खात्री असल्याचे फिरोदिया यांनी सांगितले.
चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित दळवी म्हणाले, हमसफर व भेळ या लघुपटाची थीम ही नरेंद्र फिरोदिया यांच्या कल्पनेतून आली आहे. हा हमसफर लघुपट इफीमध्ये आला आहे. विजय पाटकर यांना ही स्क्रीप्ट खूप आवडली होती. विजय पाटकर यांनी लिलया अभिनय केलाय. आता झारखंड आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल बेस्ट अॅक्टर पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
अनुष्का मोशन पिक्चर्स अॅंड एंटरटेन्मेंटची प्रस्तुती
उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असणारा हा लघुपट आहे. या लघुपटात मुख्य भूमिका अभिनेते विजय पाटकर यांची आहे. तर अभिजित दळवी यांनी लघुपट दिग्दर्शित केलाय.
