Smita Ashtekar on Fiare : अडत व्यापारी नितीन दत्तात्रय चिपाडे हे भिंगारचे जावई आहेत. त्यांच्यावर लोकप्रतिनिधीच्या पीएने भ्याड हल्ला केला आहे. लोकप्रतिनिधीच्या पीएवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या महिला नेत्या स्मिता आष्टेकर यांनी दिला आहे.
नितीन चिपाडे यांना समाजकंटकांकडून मारहाण करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आज (शनिवारी) जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, प्रा.माणिक विधाते, बाळासाहेब बोराटे, अंबादास गारुडकर, भगवान फुलसौंदर, अॅड.अभय आगरकर, किशोर डागवाले, शरद झोडगे, मंगल भुजबळ, जालिंदर बोरुडे, मळू गाडळकर आदी उपस्थित होते.
दहशतवाद्यांकडे 300 किलो आरडीएक्स कुठून आले?, मलिकांच्या दाव्यानंतर काँग्रेसचा सवाल
निवेदनात म्हटले आहे की, कांदा व्यापारी नितीन चिपाडे यांना 13 एप्रिलला मार्केट यार्ड परिसरामध्ये गुंडांनी प्राणघात हल्ला केला, असे असतांना त्यांना कोणतेही मदत मिळाली नाही व संरक्षणही मिळाले नाही. हे गुंड शहरामध्ये रोज गुन्हे करुन मोकळे फिरत आहेत. त्यांना अटक होत नाही, असे असताना देखील त्यांच्या कुटूंबाला वारंवार धमक्या दिल्या जातात. तरी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून चिपाडे कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळावे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.