Download App

नाथाभाऊंची लोकसभा लढण्याची इच्छा : भाजपकडून रक्षा खडसेंची उमेदवारी कन्फर्म; लीडही जाहीर!

पुणे : रावेरची जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि पक्षाने आदेश दिला, तर पक्षाच्या आदेशाचा मी नक्कीच विचार करेल, असं म्हणतं आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यावर अवघ्या काही तासातच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत त्यांचे लीडही जाहीर केले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. (State President of BJP Chandrashekhar Bawankule announced the candidature of Raksha Khadse for the 2024 Lok Sabha elections and her lead)

बावनकुळे म्हणाले, एकनाथ खडसे साहेब जरी निवडणूक लढले तरी रक्षाताई खडसेंनी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात आमच्या सर्वच खासदारांनी चांगले काम केले आहे, पण त्यात रक्षा खडसेंनी उत्तम काम केलं. त्यामुळे कोणी लढलं तरी रक्षाताई या दोन लाख मतांनी निवडून येतील इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. दरम्यान, बावनकुळे यांच्या या विधानामुळे रावेरमध्ये सासरे विरुद्ध सून अशी लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Arvind Sawant : कंत्रांटी भरती ते मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ; सावंतांनी दिला आंदोलनाचा इशारा

काय म्हणाले एकनाथ खडसे?

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं की रावेर लोकसभा मतदारसंघाचे धनुष्यबाण तुम्ही उचलावं. रावेर मतदारसंघ आजवर काँग्रेस लढवत आली आहे. 1989 ते 2019 या काळात नऊ निवडणुका झाल्या असून या सर्व निवडणुका काँग्रेस हारली होती. केवळ एक निवडणूक काँग्रेसने 13 महिन्यांसाठी जिंकली होती. काँग्रेसला नऊवेळा या मतदारसंघात हार पत्करावी लागली होती. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीने लढवावी, असा पक्षाचा मानस आहे. मात्र, इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय व्हायचा आहे. या बैठकीत जर ही जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि पक्षाने आदेश दिला, तर पक्षाच्या आदेशाचा मी नक्कीच विचार करेल, असं खडसे म्हणाले.

‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं

रक्षा खडसे काय म्हणाले?

नाथाभाऊ जे की माझे वडील आहेत आणि ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी जे काही विधान केले तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. पण आज मी इथे भारतीय जनता पक्षाची खासदार आहे, कार्यकर्ता आहे. जर लोकसभेसाठी मला परत पक्षाने संधी दिली तर माझी पूर्णपणे तयारी आहे. या 10-12 वर्षांमध्ये जो काय माझा राजकीय अनुभव राहिलेला आहे, त्यामुळे मी आता स्वतःचे निर्णय घेण्यासाठी स्वतः सक्षम आहे. हा निवडणुकीचा विषय शेवटी जनता ठरवत असते की कोणाला मतदान करायचं. नाथाभाऊंचा तेवढाच आदर आजही आहे आणि पुढे भविष्यात सुद्धा राहणार आहे.

Tags

follow us