Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर टीका टिपण्णी करत असतात. यातच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. कर्जत येथे अंबादास (बप्पाजी)शंकरराव पिसाळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलताना ते म्हणाले, आजवर विविध निवडणुकांमध्ये आपण किंगमेकरची भूमिका घेतली होती. ती तशीच कायम ठेवा. बदलत्या राजकारणात आपण पाहिलं आहे की, किंगमेकर जेव्हा किंग होतो. तेव्हा त्याची सगळे मिळून कशी वाट लावतात. त्यामुळे आपण आपली भूमिका अशीच ठेवावी. असे ठाकरे कुटुंबियांचे उदाहरण देत खासदार विखे यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंना शाब्दिक टोला लगावला आहे. ( Sujay Vikhe Criticize Udhav Thackery on Maked CM )
समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी महामृत्यूंजय यंत्र; अंनिस आक्रमक, गुन्हा दाखल
कर्जत येथे अंबादास (बप्पाजी)शंकरराव पिसाळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आ. प्रा.राम शिंदे , राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार सुजय विखे यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.
बाबरीच्या वेळी उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत होते; राणेंचा जोरदार प्रहार
यावेळी बोलताना विखे म्हणाले, बापाजी पिसाळ यांनी मागील तीस पस्तीस वर्षापासून जनतेची सेवा केली आहे. ही सेवा करताना त्यांनी विविध पक्षातील नेत्यांकडे वेळोवेळी धावा देखील केला. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सोबत या भागातील जनतेच्या विकास करिता सहकारात त्यांनी काम सुरू केले. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी या भागात सेवा सहकार सोसायटीचे जाळे निर्माण केले आहे.
सतत जनतेचा विचार करणारे बाप्पाजी यांनी बदलत्या राजकारणात देखील विखे पाटील कुटुंबा सोबत आपली निष्ठा कायम ठेवली हे विशेष, सध्या कोण कुठे हे सांगणे अत्यंत कठीण जात आहे. मात्र असे असले तरी तुमची जनतेशी नाळ घट्ट आहे. त्यामुळे मला माझा लोकसभेच्या निवडणुकीसाठी कुठलीही शंका राहिली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता सेवानिवृत्ती घ्यावी असे त्यांना सांगताना कुटुंबासाठी आता जास्तीतजास्त वेळ द्यावा असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी केले आहे.