वर्ल्ड बँकेसारख्या संस्थेत काही संधी मिळू शकते का ? जिल्हा बँकेवरून सुजय विखेंचे मिश्किल उत्तर

Sujay Vikhe: माझा सध्या जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी कोणताही संघर्ष किंवा प्रयत्न सुरू नाही. माझे प्रयत्न वेगळ्या दिशेने सुरू आहेत.

Sujay Vikhe

Sujay Vikhe

Sujay Vikhe On ADCC Bank Chairman: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक जाहीर (ADCC Bank( झालीय. निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर आता राजकीय आडाखे बांधले जात आहेत. निवडणूक पार पडण्यापूर्वीच जिल्हा बँकेचे चेअरमन कोण होणार याची चर्चा सुरू झालीय. भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे नाव आघाडीवर असल्याचे राजकीय चर्चा आहे. त्यावर आता डॉ. सुजय विखे यांनी स्पष्टीकरण करत एक मिश्किल टिप्पणी केलीय.

माझा सध्या जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी कोणताही संघर्ष किंवा प्रयत्न सुरू नाही. माझे प्रयत्न वेगळ्या दिशेने सुरू आहेत. जागतिक स्तरावर, विशेषतः वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांमध्ये काही संधी मिळू शकते का, यासाठी मी प्रयत्न करत आहे. देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला काही काम करण्याची संधी मिळते का ? अशी मिश्किल टिप्पणी सुजय विखे यांनी केलीय.


निवडणूक आयोगात कोणतेही ‘मतभेद’ नाहीत; SIR’बाबत तिन्ही आयुक्त एकत्र, आयोगाने केला मोठा खुलासा


मुख्यमंत्री ठरवतील कुणाला चेअरमन करायचे ?

सुजय विखे म्हणाले, जिल्हा बँकेच्या संदर्भात माझ्या नावाची चर्चा सुरू आहे. हे माझ्याही कानावर येत आहे. मात्र माझ्या विरोधात कोण आहे, मला कोणाचा त्रास आहे किंवा माझा कोणाला त्रास आहे, याची मला कल्पना नाही. माझ्या नावावर शिक्कामोर्तब व्हावं यासाठी मी कुठेही धावत नाही. मी कधी म्हटलं आहे का की, मी जिल्हा बँकेचा चेअरमन होणार आहे? माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. मुख्यमंत्री महोदय ज्याला योग्य समजतील, तोच व्यक्ती जिल्हा बँकेचा चेअरमन होईल होईल.


कोल्ड फायरची विद्युत रोषणाई अन् पुष्पवृष्टी वैभवशाली मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भावपूर्ण निरोप

माझा सध्या जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी कोणताही संघर्ष किंवा प्रयत्न सुरू नाही. माझे प्रयत्न वेगळ्या दिशेने सुरू आहेत. जागतिक स्तरावर, विशेषतः वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांमध्ये काही संधी मिळू शकते का, यासाठी मी प्रयत्न करत आहे. देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला काही काम करण्याची संधी मिळते का, हे मी पाहत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. हीच माझी भूमिका कालही होती आणि आजही तीच भूमिका आहे, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version