…तर मालेगाव वाचलं नसतं; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

नाशिक : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मालेगावमध्ये सभा घेतली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह (Shinde Group)भाजपवरही (BJP)जोरदार टीका केली. त्यातच त्यांनी कोरोना (Covid-19)काळात आलेल्या संकटाबद्दल सांगितलं. यावेळी ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. एक मुंबईमधली धारावी (Dharavi) आणि दुसरी मालेगाव(Malegaon). अगदी मुल्ला, मौलवींशीही आपण त्यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्स (Video Conference)केल्याचे उद्धव […]

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

नाशिक : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मालेगावमध्ये सभा घेतली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह (Shinde Group)भाजपवरही (BJP)जोरदार टीका केली. त्यातच त्यांनी कोरोना (Covid-19)काळात आलेल्या संकटाबद्दल सांगितलं. यावेळी ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. एक मुंबईमधली धारावी (Dharavi) आणि दुसरी मालेगाव(Malegaon). अगदी मुल्ला, मौलवींशीही आपण त्यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्स (Video Conference)केल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. ठाकरे म्हणाले की, तुम्ही सर्वांनी त्यावेळी सहकार्य केलं नसतं तर मालेगाव वाचलं नसतं, त्यामुळे माझं पहिलं कर्तव्य आहे की, तुम्हाला धन्यवाद देतो असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray यांचा शिंदे गटावर हल्लाबोल : गेल्या वर्षी एक ‘कांदा’ ५० खोक्याला विकला गेला!

सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दादा भुसेंच्या मतदारसंघात सभा घेतली आहे. यावेळी सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यावेळी अनेक कार्यकर्ते हातात खोके घेऊन आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी कोरोना काळातला मालेगाव आणि धारावीमधील परिस्थितीची आठवण करुन दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, हो मी कॉन्फरन्सद्वारे सर्वांना बोलत होतो. तरीदेखील तुम्ही ते ऐकलंत त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही मला आपल्या कुटुंबातलं मानलं. मुख्यमंत्रिपद येतं आणि जातं. पण तुम्ही मला जे प्रेम दिलं आणि देत आहात, मला नाही वाटत हे गद्दारांना मिळत असेल.

आजची सभा पाहिल्यानंतर शिवसेनेचं काय कमी केलं तुम्ही? नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं, पण ही माझी माणसं प्रेम करणारी माणसं ही नाही चोरु शकत, ही भाड्यानं नाही आणता येत. प्रेम विकत घेता येत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

Exit mobile version