राहुरी तालुक्यातील ‘या’ गावांना मिळणार दिवसा वीज

अहमदनग : काल अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बाभुळगाव, ता. राहुरी येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर उर्जा निर्मिती प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याचा मुद्दा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केला होता. आज सकाळी पुन्हा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. मंत्रीमहोदयांनी माहिती घेऊन उचित कार्यवाहीचे आश्वासन दिले. राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील सौर उर्जा निर्मिती […]

24 Hours Free Electricity For Farmers

24 Hours Free Electricity For Farmers

अहमदनग : काल अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बाभुळगाव, ता. राहुरी येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर उर्जा निर्मिती प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याचा मुद्दा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केला होता. आज सकाळी पुन्हा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. मंत्रीमहोदयांनी माहिती घेऊन उचित कार्यवाहीचे आश्वासन दिले.

राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाबाबत गेले दोन दिवस सातत्याने विधानसभेत आवाज उठवला. काल प्रश्नोत्तराच्या तासात मी अत्यंत गंभीरपणे हा मुद्दा मांडला. त्यावर उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासून कार्यवाही करण्याचे आश्वासित केले होते.

मला आनंद वाटतो आहे की, या पाठपुराव्यामुळे आजपासून वरवंडी व बाभुळगाव या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा चालू झाला आहे. या दोन्ही गावातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. माझ्यावर मोठा विश्वास पण टाकला आहे. पुढे मी आमदार होईल अथवा नाही याची मला पर्वा नाही. पण जो विश्वास जनतेनी 2019 साली माझ्यावर टाकला, त्याला पात्र राहण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे. असे
तनपुरे सभागृहात म्हणाले.

Exit mobile version