Download App

यात्रेत दोन गट भिडले, वाद विकोपाला

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : क्षेत्र मढी येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेली गोपाळ समाजाची मानाच्या होळी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पेटली. पोलिसांना चकवा देत गडाकडे जाणारा पारंपारिक मार्ग मानकऱ्यांनी अचानक बदलल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत मूळ मार्गाकडे वळवले. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली. होळी पेटल्यानंतर एक तासाने दोन गटात हाणामारी होऊन एका गटाने दुसऱ्या गटावर अचानक हल्ला केला. पोलिसांनी धाव घेताच हल्लेखोर पळून गेले .

चैतन्य कानिफनाथ मंदिर बांधण्याला गोपाळ समाजाने खूप मोठी मदत केल्याने गावची सार्वजनीक होळी पेटवण्याचा माण त्या समाजाला देऊन स्थानीक ग्रामस्त आज होळी करत नाहीत. मानकरी यांचा मार्ग ऐनवेळी बदलल्याने पोलीस यंत्रणांची धावपळ उडाली. पोलिसांनी वेळेस सतर्क होत मानकर यांना गड्या गडाच्या पायथ्याशी रोखले. त्यांनतर पाच मानकऱ्याना पोलीस बंदोबस्तात कानिफनाथ गडावर गेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील

यांनी कडक भूमिका घेत जे मानकरी हजर असतील त्यांनाच गोवऱ्या दिल्या जातील अशी आक्रमक भूमिका घेतली. नाथाच्या समाधीचे दर्शन घेऊन देवस्थान समितीच्या वतीने मानकर यांना गौर्या देण्यात आल्या. मानाच्या गोवऱ्या घेत त्या डोक्यावर ठेऊन कानिफनाथांच्या समाधी मंदिराला प्रदिक्षणा घातली. त्यानंतर गडाच्या पायथ्याला साखर बारवेजवळ पोलीस बंदोबस्तात पाच मानकरी येऊन होळी पेटविण्यात आली. होळी पेटवताना होळीच्या बाजूने बसून तणाव निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी खाक्या दाखवत बाजूला केले. त्यानंतर नामदेव माळी ,माणिक लोणारे ,हरिभऊ गव्हाणे ( हंबीराव ) , रघुनाथा काळापहाड , भागिनाथ नवघरे , ज्ञानदेव गिऱ्हे , या गोपाळ सामाजाच्या मानकऱ्यानी होळी पेटवली .

Gopichand Padalkar : ‘संजय राऊत हा वेडा झालेला माणूस’; पडळकरांची टीका 

१९९४ साली होळी पेटवीण्याच्या मान पाना वरून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन मानाची होळी बंद पडली त्यांनंतर २००६ साली न्यायालयामध्ये दोन्ही गटामध्ये समेट घडुन होळी पेटवीण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र अनुचीत प्रकार ऐनवेळी घडु नये म्हणुन प्रंचड पोलस बंदोबस्त मोठया प्रमाणावर असतो होळी पेटवतानातिन पोलीस निरीक्षक यांच्यासह १२५ कर्मचारी

पोलीस दंगल नियंत्रण पथक होमगार्ड असा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला . होता . या वेळी प्रांतअधिकारी प्रसाद मते ,तहसीलदार श्याम वाडकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील ,रामेश्वर कायंदे ,सचिन लिबकर,गुप्तवार्ताचे भगवान सानप ,मढी देवस्थान समीतीचे अध्यक्ष बबन मरकड , सरपंच संजय मरकड उपसरपंच रवींद्र आरोळे ,देवस्थानचे कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड ,विश्वस्त अर्जुन शिरसाठ शामराव मरकड , डॉ . विलास मढीकर ,मार्केट कमिटीचे माजी संचालक नवनाथ मरकड , ग्रामसेवक विठ्ठल राजळे ,आदीसह गोपाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags

follow us