Download App

धर्मांतर प्रकरणावर विखे संतापले…पोलिसांना दिले महत्वाचे आदेश

  • Written By: Last Updated:

अहमदनगर जिल्ह्यामधील  राहुरी तालुक्‍यातील उंबरे येथील धर्मांतराची घटना अतिशय गंभीर असून, याची संपूर्ण चौकशी करण्‍याचे आदेश जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती पुढे आणण्‍यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्‍न करीत आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच यापूर्वी श्रीरामपूर तालुक्‍यात अशाच घटना घडल्‍या होत्‍या, त्‍यावेळी मोक्‍का कायद्यान्‍वये कारवाई करण्‍यात आली होती. परंतू समाजातील जबाबदार घटकांनीही पुढे येवून अशा प्रवृत्तीबद्दल माहिती देण्‍याचे आवाहन यावेळी महसूलमंत्री विखे पाटील यांनी केले आहे. (Vikhe angry over conversion case…Important orders given to police)

नेमकी घटना काय?
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. क्लासच्या नावाखाली धर्मांतराचे रॅकेटच पर्दाफाश झाला आहे. क्लासमध्ये जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना तुम्ही तुमचा धर्म सोडा व आमचा धर्म स्वीकारा म्हणत त्यांचा विनयभंग करण्यात आला, तसेच त्यांच्या क्लासच्या शिक्षिकेने आमच्या धर्मांच्या मुलांबरोबर बोलत जा, अशी धमकी देखील पीडित मुलींना दिली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित शिक्षिकेसह नऊ जणांवर विनयभंग व पोक्‍्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याबाबत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, राहुरी तालुक्‍यातील उंबरे येथील घटना अतिशय गंभीर असून, याची संपूर्ण चौकशी करण्‍याचे आदेश जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती पुढे आणण्‍यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्‍न करीत आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

तसेच यापूर्वी श्रीरामपूर तालुक्‍यात अशाच घटना घडल्‍या होत्‍या, त्‍यावेळी मोक्‍का कायद्यान्‍वये कारवाई करण्‍यात आली होती. उंबरे येथील घटना पाहता ज्‍या पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत अशा घटना घडतील तेथील पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्‍याच्‍या सूचना यापूर्वीच दिल्‍या आहेत. परंतू समाजातील जबाबदार घटकांनीही पुढे येवून अशा प्रवृत्तीबद्दल पुढे येवून माहिती देण्‍याचे आवाहन महसूलमंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

‘आनंद दिघेंचं नाव गद्दारांशी जोडू नका, ते निष्ठावंत शिवसैनिक’; राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

लव्ह जिहाद प्रकरणावर खासदार विखे म्हणाले…

गेल्या काही दिवसांमध्ये लव जिहाद प्रकरण देखील वाढले आहे यास अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येक समाजातील धर्मगुरूंनी पुढाकार घेऊन या गोष्टींना आळा कसं बसेल यासाठी प्रयत्न करावे धर्मगुरूंच्या माध्यमातून प्रबोधन होणे गरजेचे सध्या सद्यस्थितीला सामाजिक परिस्थिती ही कोणत्याही लोकप्रतिनिधीला आटोक्यात येण्यासारखी राहिलेली नाही कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राहावी यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन तसेच हे प्रश्न मिटवले पाहिजे

Tags

follow us