Download App

Nashik graduate constituency Election : आज नाशिक पदवीधरसाठी मतदान; मतदारांना एक दिवसाची रजा

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council)नाशिक पदवीधर मतदार (Nashik graduate constituency) संघाच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी (दि. 30) मतदान होत आहे. प्रशासनाकडून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी पाच जिल्ह्यांमध्ये 338 मतदान केंद्र तयार केली आहेत. पदवीधर मतदारांसाठी एका दिवसाची नैमित्तिक रजा देखील मंजूर करण्यात आली आहे. आज सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे (Deputy Commissioner Ramesh Kale)यांनी दिली.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी 2 लाख 62 हजार 721 मतदान करणार आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदार अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात एक लाख 15 हजार 638 मतदार आहेत. तर नाशिक (Nashik)जिल्ह्यात 69 हजार 652 मतदार, जळगावमध्ये(Jalgaon) 35 हजार 58 मतदार, धुळे (Dhule) 23 हजार 412 आणि नंदूरबारमध्ये (Nandurbar)18 हजार 971 मतदार आहेत. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe)आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil)यांच्यात प्रमुख लढत मानली जातेय.

नाशिक विभागात मतदारांची संख्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्यामुळं सर्वाधिक 147 मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात आहेत. नाशिकमध्ये 99 केंद्र, जळगाव जिल्ह्यात 40 केंद्र, धुळ्यात 29 केंद्र आणि नंदुरबार जिल्ह्यात 23 मतदान केंद्रं आहेत. नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रं आहेत.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी आज सोमवारी मद्यविक्री करण्यास मनाई असून, कोरडा दिवस जाहीर करण्यात आलाय.

Tags

follow us