Chhagan Bhujbal म्हणाले आता बाळासाहेबांनी बोललंच पाहिजे

नाशिक : सत्यजित तांबे (Satyajit Tambe)जेव्हा काँग्रेसबद्दल (Congress)बोलतात, त्यावेळी लोकांमध्ये काँग्रेसबद्दल आणि काँग्रेसच्या नेत्यांबद्दल (Congress leader)संभ्रम निर्माण होत आहे, त्यामुळं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी यात लक्ष घालावं, असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं. आज ते येवला (Yevala) दौऱ्यावर असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. संभाजी […]

Raut (12)

Raut (12)

नाशिक : सत्यजित तांबे (Satyajit Tambe)जेव्हा काँग्रेसबद्दल (Congress)बोलतात, त्यावेळी लोकांमध्ये काँग्रेसबद्दल आणि काँग्रेसच्या नेत्यांबद्दल (Congress leader)संभ्रम निर्माण होत आहे, त्यामुळं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी यात लक्ष घालावं, असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं. आज ते येवला (Yevala) दौऱ्यावर असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
YouTube video player
संभाजी पवार (Sambhaji Pawar)हे राष्ट्रवादीत येणार असं विचारल्यानंतर भुजबळ म्हणाले की, संभाजी पवार यांनी फेडरेशनच्या निवडणुकीमध्ये भुजबळ यांना मदत केली होती. त्यामुळं त्यांनी आम्हाला अनेक वेळेस घरी जेवायला देखील बोलवले होते.

आज मी त्यांच्या घरी चहा पिण्यास जाणार आहे, त्याचा अर्थ काय ते लगेच शिवसेनेतून राष्ट्रवादीत येतील? असं काही नसून आमची शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळं याबाबत काही कोड्यात पडण्याचं काही कारण नाही असंही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितलंय.

Exit mobile version