Satyajeet Tambe On TET Paper Leak : शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षेचा पेपर फुटल्याने उद्या (28 जून) होणारी परीक्षा रद्द करावी लागली आहे. यावर आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी यंत्रणेवर गंभीर आरोप केला आहे. भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच ही व्यवस्था जाणीवपूर्वक सुधारली जात नाही. ही सिस्टीम सुधारूच नये, ही व्यवस्था पारदर्शक होऊच नये, अशीच काहींची मानसिकता आहे, हे माझं ठाम मत आहे, असा आरोप आमदार तांबे यांनी केला आहे.
कुंपणाने शेत खाल्ले ! कृषी राज्यमंत्र्यांना आपल्याच खात्यातून काकडी पिकासाठी एक कोटींचे अनुदान
केवळ TET नव्हे तर अन्य परीक्षांचाही संदर्भ देत आमदार तांबे यांनी ही मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे, काही दिवसांपूर्वी NEET, CBSE मूल्यांकनातील गोंधळ, UGC-NET आणि विविध प्रवेश व भरती परीक्षांमधील अनियमितता यामुळे प्रत्येक वेळी लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया जातो आणि यामुळे येणारी उदासीनता आणि मानसिक नैराश्य तर वेगळंच ! TET ची केस थोडी वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सेवेत राहण्यासाठी नोकरी असलेल्याही सर्व शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे 20-30 वर्षे सेवा केलेले शिक्षकही जे आपल्या सेवापूर्तीच्या अंतिम टप्प्यात आहे त्यांना सुद्धा आपली नोकरी वाचवण्यासाठी ही परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. त्यामुळे ही परीक्षा पास करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांच्या स्वप्नांवर एकप्रकारे घाला घालण्याचंच पापच या व्यवस्थेने केले असे तांबे म्हणाले.
गोवाल पाडवींच्या नावावर 279 विकासकामे, पण पूर्णत्वाचा आकडा शून्य; निधी वापराबाबत प्रश्नचिन्ह
आता देशाला स्वातंत्र्य मिळून लवकरच जवळपास 80 वर्षे होतील. जग AI आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचलं आहे. पण आपण अजूनही पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा व्यवस्था उभी करू शकलो नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? आजही आपण MPSC चे निकाल वेळेवर देऊ शकत नाही, परीक्षा कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन घेतो. या सर्वच विषयांवर आपण परवाच विधिमंडळात आवाज उठवत याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. खरंतर भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच ही व्यवस्था जाणीवपूर्वक सुधारली जात नाही. ही सिस्टीम सुधारूच नये, ही व्यवस्था पारदर्शक होऊच नये, अशीच काहींची मानसिकता आहे, हे माझं ठाम मत आहे, असा आरोप आमदार तांबे यांनी केला आहे.
