Sujay Vikhe On Ram Shinde : भाजपचे (BJP)विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपणही इच्छूक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)आणि राम शिंदे यांच्या सुप्त वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. याबाबत सुजय विखे यांना विचारले असता मला त्यांच्या वक्तव्याबद्दल काही माहिती नाही, मी दिल्लीत होतो, मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं नाही, मला काही लोक बोलले…पण कोणी व्यक्ती खासदार असेल हे तितकं महत्त्वाचं नाही, जितकं नरेंद्र मोदी(Narednra Modi) देशाचे पंतप्रधान (PM) असतील. आम्ही सगळे भाजपाचे कार्यकर्ते या नात्याने आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही. आम्ही 2024 ला नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते आम्ही करणार. मी कुठल्या पदावर असायला पाहिजे अशी माझी काही अपेक्षा नाही, असंही खासदार विखे म्हणाले.
बंदी असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भरदुपारी शिवपुराण कथा
त्याचवेळी विखे कुटुंबाचे राजकीय वर्चस्व वाढत असल्याने असे प्रकार होत आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुजय विखे म्हणाले की, आमचे कुठलेही राजकीय वर्चस्व वाढलेले नाही. आम्ही भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिप्रामाणिक काम करत आहोत. नामदार राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)पाटील हे सात टर्म आमदार आहेत. भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांच्यावर नसून आम्हाला निस्वार्थ भावनेने काम करायचं आहे.
पारनेर बाजार समितीसाठी कट्टर विरोधक असलेले आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी एकत्र आले, याबाबत बोलताना सुजय विखे म्हणाले की, हेच आमच्या कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे, जिथे जातात तिथे सगळे विरोधक एकत्र होतात, मला याचा आनंद आहे. रात्रीत युती करण्याचा प्रकार जनतेपुढे आला आहे. अनेक तालुक्यांमध्ये अशा छुप्या युती आहेत. जे हळूहळू जनतेपुढे येतील, मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता शेवटी मतदान आम्हालाच करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पारनेर तालुक्यात बाहेरचे लोक लक्ष घालत आहे, या लंके आणि औटी यांच्या टीकेला उत्तर देताना सुजय विखे म्हणाले की, एका गेस्ट हाऊसमध्ये बसून दोन व्यक्त असं ठरवू शकत नाही की सुजय विखे बाहेरचे आहेत. जनतेने मला मतं टाकली, खासदार केलं, गरिबांचे काम माझ्याकडून झालेत. तर मी त्यांच्या बोलण्याने बाहेरचा होत नाही, असंही खासदार विखे म्हणाले.