Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबे भाजपात जाणार? विखे पाटलांकडून पक्षप्रवेशाची ऑफर

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांचा विजय निश्चित असल्याचं भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)यांनी म्हटलंय. त्याचवेळी सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेशाची ऑफर (Offer to join BJP)दिली आहे. तांबे यांच्या समर्थनात राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. एवढंच नाही तर सत्यजित तांबे यांनी […]

Tambe

Tambe

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांचा विजय निश्चित असल्याचं भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)यांनी म्हटलंय. त्याचवेळी सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेशाची ऑफर (Offer to join BJP)दिली आहे. तांबे यांच्या समर्थनात राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. एवढंच नाही तर सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह कायम राहणार असल्याचंही विखे पाटील यांनी म्हटलंय.
YouTube video player
आज सकाळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला मतदानाचा लोणीमध्ये हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी विखे पाटील म्हणाले की, सत्यजित तांबे निश्चित विजयी होणार, अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंसाठी मोठं काम केलंय.

भाजप कार्यकर्त्यांनी तांबेंसाठी केलेल्या कामाचा सत्यजित तांबे सन्मान ठेवतील हा विश्वास आहे. आणि सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणार आहे.

त्याचवेळी विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांना देखील टोला लगावलाय. मामानं पक्षाला मामा बनवल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच विविध राजकीय घडामोडी समोर येत आहेत. त्यामुळं नाशिकची पदवीधर मतदारसंघाची राज्यभर चर्चा सुरु आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलीय. त्यांना अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. आता भाजपानंही छुपा पाठिंबा देत सत्यजित तांबे यांच्या मागं उभे राहण्याची भूमिका घेतली. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी सत्यजित तांबे यांचा प्रचार सोशल मीडियातून केलाय.

Exit mobile version