‘लालची’ झेडपी सदस्याला स्वस्तात सोन्याच्या बहाण्याने 53 लाखांना लुटले; एलसीबीकडून टोळी दोन दिवसात गजाआड

ahilyanagar LCB -ahilyanagar LCB -शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश अनिल नलावडे यांना लुटणारी टोळी नांदेडमध्ये नगर पोलिसांनी पकडली.

Lcb Ahilyanagar

Lcb Ahilyanagar

अहिल्यानगर: स्वस्तात सोन्याच्या अमिषाने रायगडमधील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश अनिल नलावडे (Avinash Nalwade)यांना अहिल्यानगरमध्ये लुटण्यात आले होते. त्यांच्याकडून दरोडेखोरांनी तब्बल 52 लाख 80 हजार रुपयांचे सोने लुटण्यात आले होते. ही टोळी अहिल्यानगरच्या एलसीबीच्या (LCB) पथकाने अवघ्या दोन दिवसांत गजाआड केली. तसेच टोळीकडून लुटीची रक्कमही हस्तगत केलीय. (ZP member robbed of Rs 53 lakh on cheap gold;ahilyanagar LCB busts gang in two days)


5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

रायगड जिल्ह्यातील सणसवाडी येथील अविनाश नलावडे यांच्याकडे नांदेडमधील राजू मोहिते आणि अक्षय मोहिते हे दोघे कामाला होता. दोघांनी नलावडे यांना स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखविले होते. सुरुवातीला खरे सोने दिल्याने नलावडे यांचा विश्वास बसला होता. त्यामुळे आणखी सोने घेण्यासाठी नलावडे व आणखी काही जण बुरुडगाव शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आले होते. त्यावेळी दरोडेखोरांना नलावडे व इतरांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने 52 लाख 80 हजार रुपयांची मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता.


1999 मध्ये 6 हजार पगार… 2026 मध्ये घरी ईडीचा छापा, पाच घरं, 13 भूखंड अन् दोन कोटी रोकड, इंजिनिअर अटक

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तपास करत नांदेडमधील झेंडीगुळा लोणी (ता.किनवट) येथील आरोपींचे घरी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले आहे. शिवाजी उर्फ शिवा विठ्ठल मोहिते वय- 52 वर्षे रा. झेंडीगुळा लोणी ता.किनवट जि.नांदेड 2) राजू उर्फ चंदु रामदास मोहिते वय-36 वर्षे रा. सदर, 3) अक्षय उर्फ आकाश रामदास मोहिते वय-27 वर्षे रा. मालठा ता.हातगाव जि.नांदेड, 4) छगन दशरथ मोहिते वय-36 वर्षे रा. याडी ता.नेर जि. यवतमाळ, 5) दिनेश सुदाम जाधव वय-24 वर्षे रा.दगडवाडी, ता.हातगाव जि.नांदेड) अशा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 16 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने, एक स्वीप्ट कार, बनावट सोन्याचे नाणी, असा 26 लाख 52 हजार रुपयांचा मुद्दमाल जप्त केला आहे.

Exit mobile version