नवी मुंबई : डी वाय पाटील युनिव्हर्सिटीकडून (Dy Patil University) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज डी वाय पाटील स्टेडियम मध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारोहात त्यांना डी.लिट ही पदवी मारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकिय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना ही मानद डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली आहे. याबाबतची माहिती डीवाय पाटील युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी यावेळी दिली.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात माननीय राज्यपाल श्री रमेश बैस जी यांच्या हस्ते डी. लिट् पदवीने सन्मान. pic.twitter.com/PHge4gIQpA
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 28, 2023
यावेळी बोलताना युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. विजय पाटील म्हणाले, सामाजिक क्षेत्रात खास करून कोरोना काळात रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, त्यांना रेमडेसीवीर आणि इतर औषधे मिळावीत यासाठी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. शिंदे यांनी लोकांमध्ये मिसळून अनेकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
याशिवाय वैद्यकीय सोयी सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता आणि बेडस रुग्णवाहिका वेळेत मिळाव्यात यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले. तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केरळ येथील महापूर असो, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकल्यावर केलेले मदतकार्य हे उल्लेखनीय आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करताय तर सावधान… पोलिसांचा असणार वॉच!
तसेच शिंदे यांनी कोल्हापूर महाड येथे आलेल्या महापूरावेळी केलेले मदतकार्य… अशा अनेक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जात त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
जगण्याची इच्छा नसल्याचे पत्र टाकून पोलिस कर्मचारी गायब…
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून आपल्याला ही पदवी देण्यात आली आहे. आपला मुलगा जिथे शिकला, त्याच विद्यापीठाकडून डी.लिट पदवी मिळणं गौरवाची गोष्ट असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं आहे.