OBC Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा ताजा असतानाच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलायं. हिंदू वैश्य, हिंदू वाणी, आणि हिंदू वैश्य वाणी तिन्ही जाती एकच आहेत, असा निर्वाळा देत ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
जसे तुम्हाला समर्थक तसे आमच्या नेत्यांनाही समर्थक; मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर सामंतांचा पलटवार
या निर्णयामुळे आता वैश्यवाणी समाजाच्या नागरिकांना ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळणार असून जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे.
