Download App

कर्मचाऱ्यांचा हिरमोड! पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ

One month extension for transfer of government employees : राज्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी मे महिन्यात होतात. या वर्षी मे महिन्यात राज्य सरकारने (state government) बदल्यांचे आदेश (transfer order) महिनाभरासाठी स्थगित केले. त्यामुळं कर्मचारी बदली करण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ मिळाली. तसा एक शासन निर्णय आज राज्य सरकारने काढला.

https://www.youtube.com/watch?v=BkgtkczyUvE

राज्य सरकारने आज एक परिपत्रक काढत सांगितले की, बदली कायदा 2005 नुसार, प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना बदल्यांना विलंब होत आहे. सरकारने काढलेल्या या परिपत्रकात सांगिले की, सन 2023-24 या चालू आर्थिक वर्षातील दि. 31 मे, 2023 पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या दि. 30 जून, 2023 पर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

जीवे मारण्याच्या धमकीनंतर राम शिंदेंचे रोहित पवारांकडे बोट, ‘असे राजकारण कर्जत-जामखेडमध्ये…’

दरम्यान, आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोस्टिंग मिळण्यासाठी अनेकांनी आधीच फिल्डिंग लावली होती. मात्र, आता ऐनवेळी बदल्यांना एका महिन्याची स्थगिती आल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना महिन्याभरासाठी ताटकळत राहावं लागणार आहे. त्यामुलं शासकीय कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या आणखी काही दिवस होणार नसल्याची चर्चा सुरू आहे. किमान महिनाभर तरी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होणार नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू होती. तशा बातम्याही माध्यमांत प्रकाशित झाल्या होत्या. आणि हे आता खरंही ठरलं. राज्य सरकारने शासकीय बदल्यांना एका महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळं पोलिस अधिकारी, शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना बदल्यांसाठी आता 30 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Tags

follow us