Tukaram Mundhe : सुटे तेल विक्रीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेत बाजारात सुटे तेल विक्रीसाठी एका वर्षाची सूट दिली आहे. काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेत सुटे तेल विक्रीवर बंदी घातली होती मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील एका वर्षासाठी सुटे विक्री बंदीला स्थगिती देण्यात आली आहे.
अन्न व औषधे विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या सुटे तेल बंदीच्या आदेशानंतर तेली समाजाने पारंपारिक व्यवसाय असल्याचे सांगत या निर्णयाला विरोध केला होता तसेच सुटे तेल खरेदी करणारे बहुसंख्य गरीब ग्राहक असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयला स्थगिती दिली आहे.
पावसाची पाठ! शेवगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट… बळीराजा हतबल-
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज खाद्य तेल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून या बैठकीत फडणवीस यांनी सुटे तेल विक्री बंदीच्या निर्णयला स्थगिती दिली. तसेच या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी खाद्य तेल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. अन्न व औषधे प्रशासनाच्या अखत्यारीत सुटे तेल विक्रीसंदर्भात 2011 मध्ये हा कायदा झाला आहे कारण सुटे खाद्यतेल विक्रीमध्ये गुणवत्ता हा महत्त्वाचा निकष आहे. मात्र अनेक गरीब माणसं तेल घेतात त्यामुळे कायदा आणि सामान्य माणूस यातून मार्ग काढला पाहिजे. त्याच अनुषंगाने सुटे खाद्यतेल विक्रीसाठी तात्पुरती 1 वर्षाची सूट देण्यात येत आहे असं या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
