“अजित पवारांचा(Ajit Pawar) विषय कुठे आहे? अजित पवारांना यांनीच क्लीन चीट दिली आहे ना? त्याचे लाभार्थी कोण आहेत याची माहिती होणार” असल्याचं विधान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी केलं आहे. दरम्यान, अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामिल झाल्यानंतर घोटाळ्याच्या आरोपांमुळेच अजित पवार(Ajit Pawar) भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी घोटाळ्याचे लाभार्थी कोण त्याची माहिती समोर येणार असल्याचं म्हटलं आहेत.
Photos : फक्त मराठी सिने सन्मान सोहळा दिमाखात संपन्न
तसेच तुम्ही निवदेन तरी द्या, कधीकधी स्पष्टता असली तरी त्यात अस्पष्टता आहे असं दाखवल्याने समाज संघटित होतो असा भाव काही लोकांमध्ये असतो, असंही सुधीर मुनंगटीवारांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला असल्याचं मोदी म्हणाले होते.
… वाईट मनस्थिती झाली होती; किरण मानेंनी सांगितला ‘मायलेकी’ नाटकाचा किस्सा
एवढंच नाहीतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तब्बल 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आता भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांचा मीटर वाढवायला हवा असंही ते म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांनंतरच राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपसोबत सत्तेत सामिल झाला होता. पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधल्या अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन वेगळा गट बनवला. या गटासह त्यांनी भाजपाबरोबर युती केली तसेच ते महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाले. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांना मंत्रीपदं मिळाली आहेत.