Download App

Eknath Shinde : आमचं बंड बाळासाहेबांमुळेच.., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं

मुंबई : बाळासाहेबांमुळेच आम्ही धाडस करायला शिकलो अन् त्याचे पडसादही उमटले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath shinde) यांनी सांगितलंय. आज विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या(Balasaheb Thackaray) तैलचित्राच अनावरण करण्यात आलंय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. चित्रकार किशोर नादवडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र रेखाटलं आहे.

यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासह अनेक आमदार, खासदार उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांना सत्तेसाठी विचारांशी कधीही तडजोड केली नाही. बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोल होते. त्यांनी स्वत:साठी कधीही रिमोट कंट्रोलचा गैरवापर केला नाही. त्यांच्या व्यगचित्राच्या फटक्यामधून भल्याभल्यांना घाम फुटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसेच बाळासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं छोट्या-छोट्या गोष्टींकडे बारीक लक्ष असायचं. शब्द पाळणं हे आम्ही बाळासाहेबांकडून शिकलो आहोत. म्हणूनच गेल्या 25 वर्षांपासून ठाण्याची सत्ता बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कोणतीच शक्ती तुम्हांला रोखू शकणार नाही
आपण त्याचा अनुभव घेतो आहे. धाडस आणि आत्मविश्वास आम्हाला बाळासाहेबांनीच दिल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलंय.

अन्यायाविरुध्द लढण्याची ताकद बाळासाहेबांनी दिलीय. त्यांची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार राज्यात स्थापन झालं असून
आज आनंद दिघे साहेब असते तर त्यांना उर भरुन आला असता. बाळासाहेब नेहमी सांगायचे एकनाथ शिंदे आनंद दिघेच्या तालमीत तयार झालेला आहे, मला आता ठाण्याची चिंता नाही, ही आठवण शिंदे यावेळी करुन दिली आहे.

दरम्यान, बाळासाहेबांमुळेच आम्ही धाडस करायला शिकलो अन् त्याचे पडसादही उमटले आहेत, बाळासाहेब म्हणाले होते, मी सुर्याचा भक्त आहे, सुर्य उगवतो तेव्हा भगवा रंग दिसतो आणि तो आपल्याला सगळीकडे पसरवायचा…तोच विचार आम्ही पुढे घेऊन चाललो असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us