Download App

अमरावतीत अनाथ मुलांचा ‘बाप’, लाखोंना मिळाली नवी दृष्टी; महाराष्ट्रातील ‘पद्म’वीरांची कथाही अभिमानाची..

Padma Awards 2024 : प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day 2024) औचित्य साधत केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची (Padma Awards 2024) घोषणा केली आहे. पाच जणांना पद्मविभूषण, सतरा जणांना पद्मभूषण, ११० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाही तळागाळात राहून आपले कर्तव्य बजाविणाऱ्यांनाही गौरविण्यात येत आहे. या यादीत महाराष्ट्रातील अनेक जणांचा समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार एकूण 22 जणांना जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातून हॉर्मुसजी एन. कामा, वैद्यकीय क्षेत्रातून अश्विन बालचंद मेहता, सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातून राम नाईक यांना, कला क्षेत्रातून दत्तात्रय अंबादास राजदत्त, कला क्षेत्रातून प्यारेलाल शर्मा, साहित्य व शिक्षण क्षेत्रीतून कुंदन व्यास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत.

महाराष्ट्रासह मुंबईच्या विकासात उत्तर भारतीयाचं मोठं योगदान; राज्यपाल बैस यांचं मोठं विधान

पद्मश्री पुरस्कारांतही महाराष्ट्राचा ठसा उमटला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे, औषध क्षेत्रातून मनोहर डोळे, साहित्य व शिक्षणासाठी जहीर काझी, समाजसेवेसाठी शंकरबाबा पापळकर, औषधी क्षेत्रातील सेवेसाठी चंद्रशेखर मेश्राम तर व्यापार-उद्योग क्षेत्रात कल्पना मोरपरिया यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

अमरावतीत 123 मुलांचा बाप, सेवेचं झालं चीज  

यंदा पद्म पुरस्कारात महाराष्ट्रातील नामवंतांना पदके मिळाली आहेत. समाजसेवेसाठी शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या समाजसेवेची दखल केंद्र सरकारने घेतली. त्यांची तब्बल 123 मुलं अंध, दिव्यांग किंवा पूर्णतः मतिमंद आहेत. काही मानसिकदृष्ट्या विकलांग तर काहींना शारीरिक व्याध आहेत. काहींचे जीवन कायमचे अंधकारमय आहे. अशा मुलांचा सांभाळ शंकरबाबा पापळकर बापाच्या मायेने करत आहेत. विशेष म्हणजे त्यांना स्वतःचा एकही मुलगा किंवा मुलगी नाही. सन 1990 मध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-चिखलदरा रोडवर वझ्झर फाटा येथे आश्रम सुरू केला.

Padma awards 2024 : व्यंकय्या नायडूंना पद्मविभूषण, राम नाईक,मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण; राज्यातील यादी पाहा !

एक रुपयाही न घेता लाखोंच्या जीवनात प्रकाश

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. मनोहर डोळे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी एक रुपयाही न घेता नेत्रसेवा दिली. त्यांच्या याच कार्याची दखल सरकारने घेतली त्यांच्या कार्याचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.

मल्लखांबाला जागतिक ओळख, देशपांडेंच्या कामाचं पुरस्काराने कौतुक 

पद्मश्री पुरस्कारावर नाव कोरणारे उदय देशपांडे यांनी मल्लखांब खेळाला जगभरात नवी ओळख दिली. यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आज त्यांच्या या प्रयत्नांचं चीज झालं. सरकारने पदक देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. देशपांडे यांनी 50 देशांतील पाच हजार लोकांना मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यांनी मल्लखांबासाठी तयार केलेले नियम भारतीय ऑलिम्पिक संघाने देखील मान्य केले आहेत.

रेल्वे प्रवाशांचे मित्र राम नाईक, पद्मभूषणचे मानकरी  

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. राजकारणातून बाजूला असतानाही समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी लोकसंपर्क कायम ठेवला. राजकारणात असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. मुंबईकरांच्या नजरेत राम नाईक रेल्वे प्रवाशांचे मित्र याच नावाने ओळखले जातात. कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. राम नाईक जवळपास चार दशके राजकारणात होते. 2014 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपा म्हणून शपथ घेतली होती. 2019 पर्यंत ते या पदावर होते.

कल्पना मोरपरीया

व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. मोरपारिया यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच केंद्र सरकारच्या अनेक समित्यांवर काम केले आहे.

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कारांचे मानकरी 

पद्मविभूषण (एकूण : 5)
माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
चिरंजिवी (कला)
श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर

पद्मभूषण (एकूण : 17)
महाराष्ट्रातून
1) हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
2) अश्विनी मेहता (औषधी)
3) राम नाईक (सार्वजनिक सेवा)
4) राजदत्त (कला)
5) प्यारेलाल शर्मा (कला)
6) कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)

पद्मश्री (एकूण : 110)
महाराष्ट्रातून
1) उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
2) मनोहर डोळे (औषधी)
3) झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
4) चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
5) कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
6) शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)

 

follow us