Download App

जनतेला ‘पंचामृत’ तर लाडांना ‘प्रसाद’ ; खाजगी नोकरभरतीचे टेंडर भाजप आमदारांच्या कंपनीला

  • Written By: Last Updated:

महाराष्ट्र शासनाने नोकरभरती संदर्भात खासगीकरण करण्याच्या निर्णय घेतला. यात ज्या कंपन्यांना ठेके देण्यात आले आहेत ते ठेके भाजपशी संलग्नित असलेल्या नेत्याच्या कंपन्या आहेत. हे आता उघड झाले आहे. यातील क्रिस्टल ही कंपनी आमदार प्रसाद लाड याच्या कुटुंबीयांची असल्याचे समोर आले आहे. नोकरभरती करण्याचा निर्णय खाजगी ठेकदार यांना देण्याबाबत निर्णयावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गोंधळ झाला होता. यापूर्वी स्वच्छता अथवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी कामकाजाचा ठेका दिला जायचा आता कुशल अधिकारी नेमणूक करण्याचा ठेका देण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या मुद्यावर सरकारला चांगलच धारेवर धरले. सरकारला सर्व खासगीकरणाकडे न्यायचे आहे का? असा सवाल त्यांनी विधानसभेत केला. या चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना उत्तर दिले. हा प्रस्ताव महाविकासआघाडी सरकारच्या काळात आला होता. त्यावर आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांनी या बाबत निविदा काढल्या होत्या, असं फडणवीस यांनी विधानसभेत सांगितल.

याच मुद्याला हात घालत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आमचे निर्णय योग्य वाटत होते तर मग सरकार का पाडले? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हा मुद्दा गाजत असताना आता कंपन्या कुणाच्या आहेत हा मुद्दा समोर आला आहे.

यातील क्रिस्टल ही कंपनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबियांची आहे. कंपनीचे डायरेक्टर पदावर लाड यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचा समावेश आहे. अनेक वर्षापासून शासकीय, निमशासकीय, एयरपोर्ट अशा अनेक ठिकाणी अकुशल मनुष्यबळ पुरवण्याचा ठेका त्यांच्याकडे आहे. पण सध्या राज्यात भाजप सरकार सत्तेत आहे. त्या पक्षात प्रसाद लाड आमदार आहेत. म्हणून हा ठेका दिला गेला का हा मुद्दा पुढे आला आहे.

Tags

follow us