Pankaja Munde In Ahmednagar: भाजपाकडून (BJP) बीड मतदार संघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान बीडकडे निघण्यापूर्वी पाथर्डी शहरात पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची कन्या असून संघर्ष मला कधी चुकला नाही. विखे यांना आशीर्वाद देण्यासाठी मी आहे, मात्र मला आशीर्वाद देण्यासाठी कोणी नाही. माझ्यासाठी रणांगणात उतरायला कोणी नाही अशी भावनिक साथ यावेळी पंकजा मुंडे यांनी जनतेसमोर केली.
मी पहिलीचा उमेदवार असेल की मी पक्षाकडे कोणतीही उमेदवारी मागितली नाही मात्र मला पक्षाकडून स्वतःहून उमेदवारी जाहीर करण्यात आली असं देखील यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या. स्वर्गीय नेते मुंडे साहेबांनी दिलेला वारसा मी कधीही सोडला नाही लाचार होण्यापेक्षा जनतेच्या दारात जाऊन काम करत राहिले पाच वर्षे संघर्षात काढले आणि आज तुमच्या आशीर्वादाने मी आज उमेदवार म्हणून उभी आहे ही उमेदवारी येता काळात विजयाकडे जाणार असा विश्वास देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
… तर, मी जानकरांना थांबवू शकते; पंकजा मुंडेंचं पक्षाकडे बोट
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्याचे वरिष्ठ नेत्यांवर युतीबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महादेव जानकराबाबतची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली तर मी ही जबाबदारी निभावणार. कोणाला सोबत घ्यायंच हे वरिष्ठ नेते ठरवणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुणे लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज पुण्यात मोहोळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मुरलीधर मोहोळ हे गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे आहेत. मी आज त्यांची मोठी बहीण म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला आले आहे. पुण्यानंतर आता नगरलाही शुभेच्छा देण्यासाठी जाणार असून त्यानंतर बीडला जाणार आहे. मोहोळ यांच्या रुपात पुण्याला एक चांगला खासदार मिळो, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.