या रे या सारे या! बारामती निकालापूर्वी पुण्यात शरद पवारांचे ‘फॅमिली काऊन्सिलिंग; काय घडणार?

Sharad Pawar : विधान परिषदेच्या 9 जागांवर होणाऱ्या निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. या निवडणुकीसाठी

Sharad Pawar

Sharad Pawar

Sharad Pawar : विधान परिषदेच्या 9 जागांवर होणाऱ्या निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यातील मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र येणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी पवार कुटुंबीयांना स्नेहभोजनासाठी एकत्र बोलावलं आहे.

आज सध्याकांळी होणाऱ्या या स्नेहभोजनासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आमंत्रण देण्यात आले आहे. याचबरोबर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) , जय पवार, युगेंद्र पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना देखील या स्नेहभोजनासाठी आमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) सध्या मुंबईत असल्याने या कार्यक्रमाला येणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.

राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा

तर दुसरीकडे या स्नेहभोजनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या मुद्द्यावर देखील चर्चा होणार का? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोराने चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार किंवा युग्रेंद्र पवार यांना संधी मिळणार असल्याचं सांगण्यात येत असल्याने या स्नेहभोजना दरम्यान यावर देखील चर्चा होणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर मुंबईतील एका खाजगी रुग्णायलात उपचार सुरु होता. नुकतंच त्यांना डिस्चार्ज मिळाल्याने शरद पवार पुण्यातील मोदी बागेत असून उद्या पुन्हा ते मुंबईसाठी रवाना होणार असल्याने आज त्यांनी पवार कुटुंबासाठी स्नेहभोजन आयोजित केला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा, व्हायरल पत्रावर आमदार संजय गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया काय?

तर दुसरीकडे या स्नेहभोजनादरम्यान काही राजकीय चर्चा होणार नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. आज अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला तीन महिने पूर्ण होत असून आज सकाळी रोहित पवार यांनी सीआयडी कार्यलयात जाऊन काही पुरावे सादर केल्याने आज होणाऱ्या या स्नेहभोजनात यावर देखील काही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version