पवारांच्या गटाच्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द, भारतीय कुस्ती महासंघाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे (Maharashtra State Wrestling Council) अध्यक्ष असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राज्य कुस्तीगीर परिषदेला धक्का बसला आहे. भारतीय कुस्ती महासंघाकडून पवार गटाच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेची संलग्नता रद्द केली आहे. त्यामुळं गेली अनेक वर्ष अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचे कुस्तीक्षेत्रात बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरी […]

Untitled Design   2023 04 17T210944.324

Untitled Design 2023 04 17T210944.324

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे (Maharashtra State Wrestling Council) अध्यक्ष असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राज्य कुस्तीगीर परिषदेला धक्का बसला आहे. भारतीय कुस्ती महासंघाकडून पवार गटाच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेची संलग्नता रद्द केली आहे. त्यामुळं गेली अनेक वर्ष अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचे कुस्तीक्षेत्रात बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धी भरवण्यावरून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि भारतीयल कुस्ती संघय यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आक्षेप घेतला होता. त्यामुळं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषेदवर नक्की कोणाचा अधिकार असेल, यावरून मागील काही महिने बराच वाद झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद काही महिन्यांपूर्वी भारतीय कुस्ती संघाकडून बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली होती. मात्र, बाळासाहेब लांडगे यांनी या बरखास्तीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर न्यायालयाने देखील या बरखास्तीला स्थिगिती दिली होती. दरम्यान, आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेले ब्रिजभूषण सिंहांकडून ही मान्यता रद्द करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सदाभाऊ खोत यांनी नमवले; शेतकऱ्याचा जप्त केलेला टेम्पो सोडवला

भारतीय कुस्तीगीर महासंघाची उत्तरप्रदेशमधील लखनौ येथे सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेपूर्वी महासंघाच्या कार्यकारणीची बैठक झली. या बैठकीमध्ये शरद पवारांच्या कुस्तीगीर परिषदेला पाठवलेल्या नोटिशीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा यावर चर्चा करून शरद पवार यांच्या कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार रामदास दडस यांच्या परिषदेला संलग्नता मान्यता देण्यात आली आहे. यापुढं त्यांचीच परिषद कुस्तीचे कार्य पाहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Exit mobile version